राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील वाद अवघ्या राज्याने पाहिला. काही दिवसांपूर्वी हनुमान चालिसा पठणावरुन वाद सुरु असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही दिवस ते न्यायालयीन कोठडीत होते.
आणि त्यानंतर त्यांची सुटका देखील करण्यात आली होती. नवनीत राणांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही नवनीत राणा यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले. यातूनच पुन्हा एकदा राणा दाम्पत्य आणि शिवसेना नेते आमनेसामने आले.
या सर्व राजकीय घडामोडीनंतर अखेर काल अमरावतीत 36 दिवसांनी राणा दाम्पत्य पोहचलं. अंबानगरीत दाखल झालेल्या राणा दाम्पत्याचा समर्थकांनी निवासस्थानी दुग्धाभिषेक केला. सुनील राणा, युवा स्वाभिमाने जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, अजय मोरया, जयश्री मोरया यांच्या पुढाकाराने राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला असल्याच समजतं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा झाली. विशेष बाब म्हणजे यावेळी तब्बल दीडशे किलोच्या हारतुऱ्यांनी राणा दाम्पत्याचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. नागपूर ते अमरावती या प्रवासात त्यांचे अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले आहे.
मात्र ही मिरवणूक काढणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अमरावतीत काढलेल्या मिरवणूकीनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण यासह विविध कलमांच्या आधारे राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, त्यांच्या १५ कार्यकर्त्यांवरही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात राणा दाम्पत्य यांच्याविरोधात भीम ब्रिगेडचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे दिसून आले. इर्विन चौकात राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते जमले होते. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून…; शरद पवार आणि मोदींच्या ‘त्या’ भेटीवरून ओवेसी भडकले
लघवी आणि सांडपाण्यापासून बनवलेल्या ‘या’ बीअरला जगभरातून आहे प्रचंड मागणी; फायदे ऐकून बसेल धक्का
२६ दिवस जेलमध्ये राहणाऱ्या आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून मिळाली क्लीन चिट; आता नुकसान भरपाई सुद्धा मिळणार
मोदी करणार ‘गुजरात टायटन्स’ ला सपोर्ट? फायनलपूर्वी गुजरातमध्ये दाखल झाल्याने चर्चेला उधाण