कुठल्याही पक्षाने संभाजीराजेंबाबत ठोस भूमिका न घेतल्याने माजी खासदार संभाजीराजे छत्रपती राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. यानंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. या सर्व राजकारणामागे भाजपाचीच खेळी असल्याचा दावा छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराजांनी केला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील वातावरण चांगलच तापलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा आरोप संभाजीराजेंनी शिवसेनेवर केला. त्यानंतर विरोधकांनी देखील आरोप करण्याची संधी सोडली नाही. ‘हा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
आरोप – प्रत्यारोपांचे सत्र देखील चांगलेच रंगले. तर आता याचाच धागा पकडत संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजेंना शिवसेनेने उमेदवारी दिली नाही त्यामुळे छत्रपती घराण्याचा अपमान झाल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला.
मात्र ‘त्यावर हा छत्रपती घराण्याचा अपमान असं म्हणता येणार नाही. ही सगळी संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची खेळी होती. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं यासाठी भाजपाने त्यांना भाग पाडलं, असा गौप्यस्फोट संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी केला.
दरम्यान, ‘उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना व्यक्तीगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय असून छत्रपती घराण्याचा सर्व राजकीय पक्षीयांनी सन्मान केला असून कुणीही अवमान केलेलं नाही,’ असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
संभाजीराजे यांचे नाव डावलून शिवसेनेने संजय पवार यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर स्वत: छत्रपती शाहू महाराजांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. संजय पवार यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, जो अनेक वर्ष पक्षासाठी झटत होते त्यांना संधी देण्याचं काम शिवसेनेने केले त्याचा आनंद असल्याचं मत छत्रपती शाहूंनी व्यक्त केलं.
महत्त्वाच्या बातम्या
वडिलांच्या फडणवीसांवरील गंभीर आरोपांनंतर संभाजीराजेंचाही गौप्यस्फोट; म्हणाले, शिवरायांना स्मरून सांगतो…
VIDEO: पार्टीत हॉटनेसचा तडका लावण्यासाठी आली जान्हवी कपूर, पण झाली oops moment ची शिकार
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी बी-ग्रेड चित्रपटात दिले आहेत खुपच बोल्ड सीन्स, यादीत कतरिनाचेही आहे नाव
…त्यामुळे सतीची प्रथा मुस्लिमांच्या अत्याचारामुळे सुरू झाली; मनसेने सांगितला इतिहास