मानलं बुवा! अनाथ आश्रमातल्या शितलने शेतकरी मुलाशी बांधली लग्नगाठ; केली होती ‘ही’ प्रतिज्ञा

अलीकडे सगळच बदललं आहे. मुली सगळ्या क्षेत्रात प्रगती करत आहेत. यामुळे आता मुलींच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. ‘शेतकरी नवरा नको,’ अशी अटच मुली आपल्या आई – वडिलांकडे धरत आहे. यामुळे आता शेतकरी मुलांना मुली तरी कोण देणार? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

अशा सद्य परिस्थितीत देखील एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. ही बातमी वाचून तुम्हालाही नक्की अभिमान वाटेल. नक्कीच तुम्ही तुमची मुलगी देखील शेतकरी मुलाला द्यालं. शिर्डी येथील ही बातमी आहे. अचानक 2018 मध्ये वडिलांचे निधन झाले अन् शितल पोरकी झाली.

त्यानंतर तिला शिर्डीतील साईआश्रया अनाथालयाने आधार दिला. तिथच शीतलने आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुलीचे लग्नाचे वय झाल्यानं आश्रम संचालक गणेश दळवी यांनी शीतलच्या लग्नाची जबाबदारी उचलली. शीतला अनेक चांगली – चांगली स्थळ आली. मात्र तिने एक वेगळीच अट ठेवली होती.

शीतलने ठेवलेली अट वाचून तुम्हाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.  ‘करेन तर शेतकरी मुलांशी लग्न करणे अन्यथा अविवाहित राहील’ असा निर्धार शितलने केला होता. शीतलच्या या निर्धाराने गणेश दळवी हे देखील शेतकरी मुलाच्या शोधत होते. अखेर धुळे जिल्ह्यातील शेतकरी मुलाचे शीतलसाठी स्थळ आले.

दरम्यान,  मुला-मुलींची पसंती झाली. लग्नाची तारीख ठरली. आणि अखेर काल शितल आणि उमेश यांचा मोठ्या आनंदात विवाह सोहळा पार पडला आहे. विशेष बाब म्हणजे शितलचं लग्न अनाथालयाच्या अंगणात हा विवाह सोहळा पार पडला. शीतल लग्नात साईआश्रया अनाथालयातील लहान मुली करवल्या बनल्या. मोठ्या आनंदात हा विवाह सोहळा पार पडला.

विवाह सोहळा पार पडल्यावर शीतलने आपले मनोगत व्यक्त केले. ‘आजकाल मुली डॉक्टर, इंजिनिअर किंवा नोकरदारच नवरा हवा अशी अट ठेवतात. मग शेतकऱ्यांच्या पोरांनी लग्नाविनाच राहायचे का? शेतकरी जगला त्याचा वंश वाढला तर आपण जगू आपण वाचू हे माझ्या सारख्या मुलींनी विसरता कामा नये,’ असं शीतलने म्हंटलं आहे.

पुढे शितल म्हणते की, ‘माझे वडील शेतकरी होते. मी शेतकऱ्यांची मुलगी आहे. मग मी शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न का करू नये? असा सवाल शीतलने उपस्थित केला. संपूर्ण जिल्ह्यात सध्या या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्व स्तरातून शीतलवर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘बायको विकणे आहे’, ‘या’ कारणामुळे नवऱ्याने बायकोच काढली विकायला; थेट जाहिरातच दिली
कान्स महोत्सवातील अमृता फडणवीसांचा लूक चर्चेत; पहा रेड कार्पेटवरचे रॅम्पवाॅकचे खास फोटो
यासिन मलिकला जन्मठेप दिल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट; शाहिद आफ्रिकीने ओकली गरळ