साऊथचा सुपरस्टार यशचा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर बाजी मारत आहे. KGF 2 ने कमाईच्या बाबतीत असे काही विक्रम केले आहेत, जे बॉलीवूडपासून साऊथपर्यंतच्या सर्वच चित्रपटांसाठी तोडणे शक्य नाही. KGF हा हिंदी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे.(souths-hey-can-break-kgf-2s-box-office-record-find-out)
त्यामुळे जगातील सर्वाधिक कमाई करणारा हा भारताचा तिसरा चित्रपट आहे. पण काही साऊथ चित्रपटांकडून अशी अपेक्षा वर्तवली जात आहे कि, ते KGF 2 चा रेकॉर्ड मोडू शकतील. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट पुष्पा द राइज(Pushpa The Rise) चाही या यादीत समावेश आहे. चला तर मग पाहूया, या यादीत कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे.

या यादीत साऊथचा सुपरस्टार प्रभासचा चित्रपट ‘सालार’चाही समावेश आहे. रिपोर्टनुसार हा चित्रपट 200 कोटींच्या बजेटमध्ये बनवला जात आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हसनही पहिल्यांदाच दिसणार आहे. हा चित्रपट दोन पार्टमध्ये येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोन्नियिन सेल्वन:(Ponniyin Selvan:) या चित्रपटाबाबतही अशी चर्चा होत आहे कि, हा चित्रपट केजीएफ 2 चा विक्रम मोडू शकतो. हा चित्रपट देखील दोन पार्मटध्ये येणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनही दिसणार आहे. प्रभासचा आदिपुरुष हा पौराणिक चित्रपट आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करत आहेत. प्रभासचा हा सिनेमा हिंदीसोबतच तेलुगुमध्येही रिलीज होणार आहे.

‘RRR’च्या यशानंतर साऊथ स्टार राम चरण लवकरच ‘RC 15’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीही(Kiara Advani) दिसणार आहे. RRR प्रमाणे हा चित्रपटही बऱ्यापैकी कमाई करेल अशी अपेक्षा आहे. या यादीत ज्युनियर एनटीआरच्या एनटीआर 30 या चित्रपटाचे नाव सर्वात नवीन आहे. तुम्हाला आठवत असेल की राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा चित्रपट आरआरआरने भरपूर कमाई केली होती. या चित्रपटातूनही तशीच अपेक्षा आहे.








