कियारा अडवाणीचे (Kiara Advani) वैयक्तिक आयुष्य बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. काही आठवड्यांपूर्वी कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राचे (Sidharth Malhotra) ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिली नाही, मात्र चाहत्यांनी सर्व प्रकारचे अंदाज बांधायला सुरुवात केली. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळत आहेत, परंतु लोक त्यांना सोडायला तयार नाहीत. (Kiara Advani, Siddharth Malhotra, Varun Dhawan, Anil Kapoor)
नुकतेच ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी असेच काहीसे घडले तेव्हा वरुण धवन संतापला आणि त्याने प्रश्न विचारणाऱ्या रिपोर्टरलाच उलट उत्तर दिले. मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने अनिल कपूर यांना वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांना लग्नाच्या टिप्स देण्याबाबत प्रश्न विचारला. प्रश्न काहीसा असा होता- अनिल जी, तुम्ही जुने खेळाडू आहात. वरुणचे नुकतेच लग्न झाले आहे. कियाराही एक-दोन वर्षांत लग्न करणार आहे. मग तुम्ही त्यांना काही टिप्स दिल्या?
अनिल कपूर काही बोलण्याआधीच वरुण धवनने त्यांच्या हातातून माईक घेतला आणि रिपोर्टरला असे उत्तर दिले की त्याची बोलतीच बंद झाली. वरुण धवन म्हणाला, ‘तुझे आई-वडील मागणी घालायला गेले होते का?’ रिपोर्टरने ‘नाही’ असे उत्तर दिल्यावर वरुण धवन पुढे म्हणाला, ‘मग तुला कसे कळले की ती लग्न करणार आहे?’
यानंतर रिपोर्टरने थेट कियारा अडवाणीला प्रश्न विचारला की ‘जुग जुग जिओ’मधील तिचे सर्व को-स्टार्स आयुष्यात सेटल झाले आहेत आणि विवाहित आहेत. मग तिच्या पुढे अशी काही योजना आहे का? यावर कियारा म्हणाली, ‘मी जशी आहे तशी व्यवस्थित आहे. मी काम करत आहे मी कमावत आहे, मी आनंदी आहे.
गेल्या काही वर्षांपासून कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघे अनेकदा एकत्र लंच आणि डिनर डेटवर हँग आउट करताना दिसले. कियारा आणि सिद्धार्थने अनेक मुलाखतींमध्ये एकमेकांचे कौतुक केले, परंतु नात्याबद्दल काहीही बोलणे टाळले. काही आठवड्यांपूर्वी, कियारा आणि सिद्धार्थचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पण कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘भूल भुलैया 2’ च्या स्क्रिनिंगमध्ये एकत्र उपस्थितीने ब्रेकअपच्या बातम्यांना पूर्णविराम दिला.
‘जुग जुग जियो’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या कॉमेडी ड्रामाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे, तर करण जोहर निर्माता आहे. २४ जून रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात कियारा, वरुण धवन आणि अनिल कपूर यांच्याशिवाय नीतू कपूर, मनीष पॉल, टिस्का चोप्रा आणि वरुण सूद दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सिद्धार्थ मल्होत्रानंतर आता या अभिनेत्याला डेट करतीये कियारा अडवाणी? जाणून घ्या सत्य
VIDEO: कियारा अडवाणीच्या ड्रेसने दिला धोका, गर्दीत घसरला गाऊन; झाली oops मोमेंटची शिकार
सलमान ते कियारा अडवाणीपर्यंत सर्वजण पडले या चिमुकलीच्या प्रेमात; जाणून घ्या कोण आहे ती
सिद्धार्थने प्रेमाने मिठी मारताच लाजली कियारा अडवाणी, व्हिडीओ सोशल मिडीयावर झाला तुफान व्हायरल