आजकाल धावपळीच्या आयुष्यात अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. फास्ट फूड खाऊन भूक भागवतात. मात्र याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. जे प्रथिने, फायबर्स, व्हिटॅमिन शरीराला हवं ते मिळत नाही. त्यासाठी आम्ही तुम्हाला एक उत्तम उपाय सांगणार आहोत, जे करताना तुमचा अधिक वेळही जाणार नाही आणि तुमच्या शरीराला आवश्यक घटक देखील मिळतील.
वेळेअभावी लोक फास्ट फूड खाण्यासाठी पसंती देतात. त्यामुळे आवश्यक ते घटक आपल्या शरीराला मिळत नाही. आवश्यक घटकांच्या अभावी आपल्याला अनेक त्रास होऊ लागतात. अशावेळी हे टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे तुम्हाला सुक्या अंजिराचा तुमच्या आहारात समावेश करावा लागेल.
सुके अंजीर बहुगुणी असते. सकाळी रिकाम्या पोटी सुके अंजीर खाल्ले, तर ते फायदेशीर ठरते. यामध्ये प्रथिने, ए आणि बी व्हिटॅमिन, फायबर्स तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात. कोणाची तब्येत कमी होत नसेल तर, वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. डाएट, योग, व्यायाम यांच्या जोडीला सुके अंजीर आहारात नियमितपणे ठेवले, तर लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
सुक्या अंजिराचं सेवन रिकाम्या पोटी केल्यामुळे त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं शरीरात व्यवस्थित शोषली जातात. त्यामुळे शरीराला त्याचा अधिक फायदा मिळतो. अंजिरातले अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशिअम यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच मूळव्याध देखील होत नाही.
अॅन्टीऑक्सिडंट घटक सुक्या अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे हृदयाचे कार्य देखील सुरळीत राखण्यासाठी याचं सेवन उपयोगी ठरते. शिवाय हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असणारं कॅल्शियम सुक्या अंजिरांत असतं. त्यामुळे सुके अंजीर खाल्ल्याने हाडं मजबूत बनतात.
अंजीरमध्ये पाणी 80%, कॅल्शियम घटक 0.06%, कार्बोहायड्रेट 63%, फायबर 2.3%, प्रोटीन 3.5%, क्षार 0.7%, सोडियम, पोटॅशियम, तांब, सल्फर आणि क्लोरिन घटकही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे नियमित केवळ तीन चार अंजीर खाणं तुमच्यासाठी खूप फायद्याचे आहे.