Share

‘सदाभाऊ आमदारकीसाठी फडणवीसांनी सांगितले तर साडी घालून सिग्नलवर पण नाचतील’

sdabhau khota

सध्या राज्यात केतकी चितळे प्रकरण चांगलंच गाजत आहे. तर दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे चर्चेत आले आहे. सदाभाऊ खोत यांनी केतकीला समर्थन देताना ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले. “केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल,’ असं त्यांनी म्हंटलं होतं.

खोत यांनी समर्थन दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून थेट राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. काल सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर आले होते. अन् सोलापूरमध्येच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर येथील सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून आंदोलन केले. याच दरम्यान, खोत यांनी युटर्न घेतला. ‘आपण केतकी चितळेच्या पोस्टचे समर्थन केले नसल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

अजूनही राष्ट्रवादीचे नेते आक्रमक भूमिकेत आहेत.  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हान यांनी ट्विट करत खोत यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ‘सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी फडणवीसानी सांगितले तर साडी नेसतील, असं सूरज चव्हान यांनी म्हंटलं आहे.

याबाबत ट्विटमध्ये सूरज चव्हान म्हणतात,  ‘सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी केतकीचं समर्थनच काय फडणवीसानी सांगितले तर साडी घालून सिग्नलवर पण नाचतील,’ अशा जहरी शब्दात त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या चव्हाण यांचे हे ट्विट तुफान व्हायरल होतं आहे.

वाचा केतकीचे समर्थन करताना काय म्हंटलं होतं सदाभाऊ खोत यांनी… सदाभाऊ खोत यांनी केतकीला समर्थन देताना ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले होते. “केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल,’ असं त्यांनी म्हंटलं होतं.

‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा शब्द वापरुन टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती? असा सवाल उपस्थित करत अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारला घेरले होते.

दरम्यान, ‘मला केतकीचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा,’ असं खोत यांनी म्हंटलं होतं. अखेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होताच खोत यांनी आपले विधान मागे घेतले.

महत्त्वाच्या बातम्या
ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले शिवलिंग नव्हे तर कारंजे; मुस्लिम पक्षाचा फोटो जाहीर करत दावा
पुण्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, राष्ट्रवादीच्या महिलांना भाजपने चोपले
नगरच्या शेतकऱ्याची लेक आता महिला आयपीएल गाजवणार; गावातच घेतलेत क्रिकेटचे धडे
औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या ओवैसींचं अभिनेत्री रवीना टंडनकडून समर्थन? ट्वीट तुफान व्हायरल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now