सध्या अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेबसूकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला कडाडून विरोध केला आहे.
केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. अनेक नेत्यांनी तिच्या पोस्टला विरोध केला आहे. असे असताना केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
आज केतकी चितळेला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.विशेष बाब म्हणजे कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. यावेळी ‘माझी पोस्ट डिलिट करणार नाही,’ असं पुन्हा केतकीने कोर्टात ठामपणे सांगितलं.
केतकीने कोर्टात म्हंटलं की, ‘मी माझी पोस्ट डिलीट करणार नाही, मला बोलण्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही का? असा सवाल उपस्थित करत मी ती पोस्ट स्वत: लिहिली नाही. मी ती कुठूनतरी कॉपी केली आहे, असं केतकीने स्पष्टपणे सांगितलं. मी ही पोस्ट स्वखुशीनं केली असल्याचेही तिने कोर्टात सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केतकी चितळेने शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. आज न्यायालयाने तिला पोलिस कोठडी देखील सुनावली आहे. केतकीला जामीन मिळणार की तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार हे 18 मे च्या सुनावणीत आपल्याला कळणार आहे.
तर दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे काल पोलिस ठाण्यात नेत असताना केतकी चितळेवर शाई फेक करण्यात आली आहे. अशातच सोशल मिडियावर नेहमी चर्चेत असणारे किरण माने यांनी देखील यावर सविस्तर भाष्य केलं आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी केतकीच्या पोस्टला कडाडून विरोध केला आहे. ‘आता ठेचायची वेळ आलीये,’ अशा आक्रमक शब्दात त्यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
मृत्यूनंतर ‘एवढी’ संपत्ती मागे सोडून गेला क्रिकेटपटू सायमंडस; आकडा वाचून डोळे पांढरे होतील
हिंदूंबाबत गरळ ओकणारा उस्मानी अजूनही मोकाटच; कोणत्या तोंडाने हिंदुत्वाच्या बाता मारताय जनाब उद्धव ठाकरे?
….तर सरकारमधून पायउतार व्हा; ठाकरे सरकारविरोधात अण्णा हजारे आक्रमक; दिला आंदोलनाचा इशारा