कालच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या बदल्या भूमिकेवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली. तर आता कालच्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज यांना लक्ष केलं आहे. यामुळे पुन्हा मनसे आणि सेनेतील वाद चिघळणार असल्याच बोललं जातं आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षरीत्या लक्ष केलं आहे. संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे आपल्याकडे. ते स्वत स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याचाच धागा पकडत आता मनसेकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. ‘मुन्नाभाई गांधींजीचा अभ्यास करतो म्हणून त्याला गांधी दिसले. बाळासाहेबांना जाऊन इतके वर्ष झाली तरी तुम्ही कधी त्यांना दिसल्याचं बोलला नाही, असं त्यांनी म्हंटलं आहे.
महाजन यांनी एक गौप्यस्फोट केला. याबाबत बोलताना ते सांगतात, ‘२६ जुलै २००५ रोजी ज्यावेळी मुंबईत महापूर आला तेव्हा उद्धव ठाकरे पत्नी मुलांसह हॉटेलला राहायला गेले. तेव्हा बाळासाहेब मोठ्या हक्काने कृष्णकुंजवर राज ठाकरेंकडे राहायला आले होते.’
दरम्यान, ही आठवण सांगितलेली राज ठाकरेंना आवडणार नाही, मी त्यांचा ओरडा खाईन मात्र हे सांगायला हवं. पण ही सत्य घटना आहे, असं प्रकाश महाजनांनी केला. पुढे बोलताना महाजन यांनी बाळासाहेब आणि राज यांच्या नात्याबद्दल देखील माहिती दिली. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘गुरु-शिष्य अशी बाळासाहेब आणि राज ठाकरेंचं नातं होते.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना हिंदूजननायक म्हणत त्यांचा गौरव केला आहे. नांदगावकर यांनी ट्विटच्या माध्यमातून नाव न घेता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत बोलताना नांदगावकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “शिवाजी पार्क सभेचा अनभिषिक्त सम्राट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तर हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे आहेत. बाकी सगळे….जय हिंद जय महाराष्ट्र” असे खोचक ट्विट नांदगावकर यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
गाढवांनी आम्हाला लाथ मारण्याआधीच आम्ही त्यांना लाथ मारली; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
नशेत गर्लफ्रेंडसोबत असा काही प्रकार घडला, ज्याचा त्याला थांगपत्ताच लागला नाही अन् जेव्हा कळलं तेव्हा..
मुख्यमंत्र्यांनी खास शैलीत विरोधकांना घेरले; वाचा ‘मास्टर’ सभेत उद्धव ठाकरेंनी मारलेले प्रमुख टोमणे