या मुन्नाभाईच्या डोक्यात केमीकल लोच्या झालाय, फिरू द्या त्याला; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच चर्चेत आहेत. वेगवेगळ्या मुद्यांवरून मनसे थेट शिवसेनेला घेरताना पाहायला मिळत आहे. तर आता कालच्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज यांना लक्ष केलं आहे. यामुळे पुन्हा मनसे आणि सेनेतील वाद चिघळणार असल्याच बोललं जातं आहे.

अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे लागलं होतं. या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या बदल्या भूमिकेवर, विरोधकांवर याचबरोबर हिंदुत्व अशा अनेक मुद्द्यांवर टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘या मुन्नाभाईच्या डोक्यात केमिकल लोचा आहे,’ असे म्हणत राज ठाकरेंना कोपरखळी मारली आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षरीत्या लक्ष केलं आहे. संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे आपल्याकडे. ते स्वत स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणतात, ‘भगवी शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झालाय असे मुन्नाभाई फिरताहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता लगावला. तसा लोचा या सद्याच्या बाळासाहेबामध्ये झाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. फिरू द्या अशा बाळासाहेबाला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांना हिंदूजननायक म्हणत त्यांचा गौरव केला आहे. नांदगावकर यांनी ट्विटच्या माध्यमातून नाव न घेता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत बोलताना नांदगावकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “शिवाजी पार्क सभेचा अनभिषिक्त सम्राट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तर हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे आहेत. बाकी सगळे….जय हिंद जय महाराष्ट्र” असे खोचक ट्विट नांदगावकर यांनी  केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पं. शिवकुमार शर्मांच्या जळत्या चितेसमोर गुमसूम झालेला दिसला दिग्गज कलाकार, फोटोने सर्वांनाच रडवले
राज ठाकरे आणि आनंद दिघेंचा हॉस्पिटलमधला शेवटचा संवाद व्हायरल; हिंदुत्वावर बोलताना म्हणाले होते की…
भाचीवर बलात्कार करणाऱ्या मामाची सुप्रीम कोर्टाने केली सुटका, १० वर्षांची शिक्षा केली रद्द; कारण वाचून धक्का बसेल
मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणावर देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले, “ठोक के जवाब मिलेगा”!