समुद्रात वाहून आलेल्या ‘सोनेरी रथाचे’ रहस्य झाले उघड; माहिती वाचून चकीत व्हाल

मंगळवारी सायंकाळी आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम् जिल्ह्यातील सुन्नापल्ली येथे समुद्रकिनार्‍याजवळील लोकांना अचानक सोन्यासारखा चमकणारा रथ दिसला. हा रथ समुद्रातून किनार्‍याकडे सरकत होता. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे.

आंध्र प्रदेशात ‘असनी’ चक्रीवादळ आले, या दरम्यान हा रथ आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलमच्या किनाऱ्यावर लाटांमध्ये वाहून आला. हा सुवर्ण रथ पाहून लोक थक्क झाले होते. तेथील स्थानिक लोकांनी दोरीने ओढून त्या रथाला किनाऱ्यावर आणले. काही वेळातच ही बातमी सर्वत्र पसरली.

सोशल मिडियावर या सोनेरी रथाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपली मतं नोंदवली. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, हा रथ म्यानमार, मलेशिया किंवा थायलंडसारख्या दक्षिणपूर्व आशियातील कोणत्याही देशाशी संबंधित असू शकतो. चक्रीवादळामुळे पूर्वी दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते.

यावरून, हा रथ म्यानमार, थायलंड, मलेशिया किंवा इंडोनेशियासारख्या अंदमान समुद्राच्या जवळ असलेल्या देशाचा असावा असा अंदाज आहे. असनी चक्रीवादळाच्या प्रभावापासून तो भरकटला इथे आला असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप याबद्दल अचूक माहिती मिळाली नाही.

या सोनेरी रथाबद्दल अधिक माहिती म्हणजे, रथ दिसायला अतिशय सुंदर असल्याचे दिसून येते. त्याच्या वर मठाच्या आकाराची रचना बांधलेली आहे. त्यावर सोनेरी रंगाचा थर आहे. ते पाण्यात पोहता येईल अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे. रथावर परकीय भाषेत काहीतरी लिहिले आहे आणि ती मलेशियन, थायलंड किंवा जपानी भाषा असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तसेच काहींनी असाही दावा केला आहे की, तो रथ टिनच्या पत्र्यापासून बनवलेला आहे. सोन्याच्या रथाची बांधणी पाहिल्यास तो म्यानमार किंवा थायलंड याच देशातून आला आहे याची जास्त शक्यता वाटत आहे. कारण म्हटलं जात आहे की, या देशात पँगोडाज असतात ते डिक्टो असेच दिसतात.