Share

ताजमहाल आमच्या मालकीचा, आदेश दिल्यास कागदपत्रेही दाखवू, भाजप खासदाराचा मोठा दावा

देशात सध्या ताजमहालवरून नवा वाद निर्माण झाला आहे. नुकतंच ताजमहलाबाबत लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या माध्यमातून ताजमहलाचे(Taj Mahal) सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताजमहलातील २२ बंद खोल्यांमध्ये हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आहेत, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.(We own the Taj Mahal, we will show the documents if ordered, big claim of BJP MP)

यादरम्यान जयपूर राजघराण्याच्या सदस्या आणि भाजप खासदार दिया कुमारी यांनी एक दावा केला आहे. “ताजमहालच्या ठिकाणी जयपूर राजघराण्याचा महाल होता. कोणीतरी ताजमहालचे बंद दरवाजे उघडण्याचे आवाहन केले ही चांगली गोष्ट आहे. यामुळे सत्य बाहेर येईल”, असे भाजप खासदार दिया कुमारी यांनी सांगितले आहे.

या प्रकरणाची तपासणी करत असल्याचे भाजप खासदार दिया कुमारी यांनी सांगितले. ताजमहालच्या ठिकाणी जयपूर राजघराण्याचा महाल असल्याची कागदपत्रे जवळ असल्याचे देखील भाजप खासदार दिया कुमारी यांनी सांगितले आहे. ताजमहलसंदर्भात राजघराण्याच्या सदस्या आणि भाजप खासदार दिया कुमारी यांनी भाष्य केलं आहे.

भाजप खासदार दिया कुमारी म्हणाल्या की, “पूर्वी ताजमहलच्या ठिकाणी जयपूरच्या जुन्या राजघराण्याचा महाल होता. तो शाहजहानने ताब्यात घेतला होता. त्यावेळी शाहजहानचे राज्य होते. त्यामुळे जयपूर राजघराणे त्याला विरोध करू शकले नाही”, असे भाजप खासदार दिया कुमारी यांनी सांगितले आहे. यावेळी भाजप खासदार दिया कुमारी यांनी कागपत्रासंदर्भात माहिती दिली आहे.

“कागदपत्रांची गरज असेल, तर आमच्याकडे जयपूरच्या माजी राजघराण्याच्या ट्रस्टवर पोथी-खाना आहे. न्यायालयाने आदेश दिल्यास त्याची कागदपत्रे देऊ. शाहजहानला त्यावेळी हा राजवाडा आवडला आणि त्याने तो ताब्यात घेतल्याचे आमच्याकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट आहे”, असे भाजप खासदार दिया कुमारी यांनी सांगितले आहे.

भाजप नेते रजनीश यांनी ताजमहलाबाबत लखनऊ उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. ब्रिटिश काळापासून बंद असलेल्या ताजमहलमधील या खोल्यांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती, प्राचीन शिवलिंग आणि शिलालेख असू शकतात, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर लखनऊ उच्च न्यायालयात १२ मे रोजी सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
ताजमहाल मुघलांचा नाही तर आमच्या पूर्वजांचा; जयपूरच्या राजकन्येचा पुराव्यानिशी दावा
रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये वाद, संघ व्यवस्थापन जडेजाला बाहेरचा रस्ता दाखवणार?
”भाजप लोकांना रोजगार देऊ शकत नाही, भारत हा बांग्लादेश, पाकिस्तानपेक्षा गरीब देश”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now