राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा विषय शरद पवारांनी एका वाक्यात मिटवला; म्हणाले…

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच रंगलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे राज यांनी अयोध्या दौऱ्याबाबत केलेल्या घोषणेनंतर मनसैनिक तयारीला लागले आहेत.

मात्र अशातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.

याचबरोबर आता पत्रकारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारले. तेव्हा पवारांनी त्यांच्या दौऱ्याबाबत बोलताना खोचक टीका केली. शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर देत राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

याबाबत ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, “अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही”, असं शरद पवार म्हणाले. ‘कोण अयोध्येला जातंय हे मला माहित नाही,’ असं म्हणतं शरद पवार यांनी राज यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, ‘देशात महागाई, बेरोजगारी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर हेच खरे भेडसावणारे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवले जात नाहीत. देशाची सुत्रं आज ज्यांच्या हातात आहेत ते लोक आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्यामुळेच धार्मिक मुद्दे पुढे रेटून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘

दरम्यान, “हनुमान चालिसा म्हणून काही होत नाही. सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत, त्यांना प्रश्न सोडवता येत नाहीत. आज पेट्रोल आणि डिझेल याचे दर किती वाढले आहेत बघा. याबाबत लोकांनी चळवळ उभा केली पाहिजे.”, असं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशात कडाडून विरोध; 10 लाख नागरिक रस्त्यावर?
‘राज ठाकरे दंबग नाहीत, ते तर उंदीर’; भाजप खासदाराच्या घणाघाती टिकेने राजकारण तापले
आमिर खानच्या मुलीने बिकीनीवरच साजरा आपला वाढदिवस; बोल्ड फोटो पाहून लोकं म्हणाले..
राज ठाकरेंचा बाप सुद्धा माफी मागितल्या शिवाय अयोध्येत येऊ शकत नाही; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य