राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माळ, बिवलवाडी, गोलभान या दुर्गम भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच महिलांच्या देखील अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.
रणरणत्या उन्हात आदित्य ठाकरेंनी केलेला हा दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. बिवलवाडी ही ठाणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर आहे. आदित्य ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवत स्वागताचा कार्यक्रम नको असे म्हणत आदित्य ठाकरे थेट जमिनीवर बसले. आणि त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
समस्या जाणून घेत आदित्य ठाकरेंनी ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली. अवघ्या 450 लोकसंख्या असलेल्या या गावातील नागरिकांनी आदित्य ठाकरेंच्या स्वागताला कुडाच्या घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. याचबरोबर ठाकरे यांचे गावातील महिलांनी पारंपरिक लोकगीत म्हणून स्वागत केले.
“आपली परिस्थिती पहायला मी आलो आहे. घरापर्यंत पाणी येईल अशी यंत्रणा बसविण्यात येत आहे. कामाच्या पाहणीचा आढावा घ्यायला महिनाभरात परत येईन”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं. ‘वर्षानुवर्षांचा पाणी प्रश्न मिटेल,’ असाही शब्द त्यांनी दिला.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘या गावात ठाकरे आडनावाच्या कुटुंबियांची संख्या अधिक असल्याने गावातील महिलांनी पाणी टंचाईबाबत माहिती दिली. त्यावर तुम्ही पण ठाकरे आणि मी पण.. आपण एकत्र काम करून गावाची पाणी समस्या सोडवू, असं आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, “ठाकरेंना ठाकरेंचा शब्द” असल्याचे सांगत मंत्री ठाकरे यांनी गावकऱ्यांना शब्द दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी भावली धरणाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तो पूर्ण होईपर्यंत या गावची पाणी समस्या सोडविण्यासाठी टोपाची बावडी येथून पाणी लिफ्ट करून आणू. त्यासाठी कामाला सुरुवात देखील झाली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
“आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू”, रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर पलटवार
रस्त्यावरच्या धार्मिक कार्यक्रमांना कायमची बंदी; योगी सरकारचा आणखी एक क्रांतीकारी निर्णय
ख्रिस गेलसोबत IPL मध्ये झालाय अन्याय, म्हणाला, मला वाईट वागणूक मिळाली म्हणून…
मंदीर पाडल्याची चिथावणीखोर माहिती दिल्याप्रकरणी पत्रकाराला अटक