सचिनला शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकून देणारा ‘तो’ खेळाडू देतोय मृत्यूशी झुंज, किडनी झालीये फेल

भारतासाठी केवळ एक कसोटी आणि 19 एकदिवसीय सामने खेळलेला यष्टिरक्षक फलंदाज विजय यादव (Vijay Yadav) आपल्या आयुष्याची लढाई लढत आहे. विजयची किडनी पूर्णपणे खराब झाली असून तो आर्थिक संकटाचाही सामना करत आहे. भारताकडून खेळलेल्या या क्रिकेटपटूला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. अनेक क्रीडा पत्रकारांनी विजय यादवबद्दल ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.(The player who helped Tendulkar win the match in the last over is facing death)

विजय यादव सध्या डायलिसिसवर असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, असेही सांगण्यात आले आहे की विजयची ही माहिती सार्वजनिक झाल्यानंतर त्याला मदत मिळू लागली आहे. विजयबाबत माहिती मिळाल्यानंतर अनेक माजी खेळाडू त्याच्या मदतीला धावून आले असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच हरियाणा क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयनेही त्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

विजयने भारतासाठी 19 वनडे आणि एक कसोटी सामना खेळला आहे. या सामन्यांमध्ये फारशी संस्मरणीय कामगिरी नाही. पण त्याच्याबद्दल ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ट्विटरवर एक किस्सा सांगितला आहे. विजयने ट्विटमध्ये सांगितले की, 1993 मध्ये जेव्हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हिरो कपच्या सेमीफायनलमध्ये सामना खेळला जात होता. त्यामध्ये  सचिन तेंडुलकरला डावाचे शेवटचे षटक द्यायला लावणारे विजय यादवच होते.

कोलकात्यात खेळल्या गेलेल्या त्या फायनलमध्ये कॅप्टन अझरुद्दीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे ओवर सचिनकडे सोपवले. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओवरमध्ये सहा धावा करायच्या होत्या. मात्र सचिनने त्या ओवरमध्ये केवळ तीन धावा देत भारताला विजय मिळवून दिला. 55 वर्षीय विजय यादव हा एक चांगला यष्टिरक्षक आणि खालच्या फळीतील फलंदाज मानला जात होता. जो चांगल्या स्ट्राईक रेटने धावा काढायचा.

1993 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झिम्बाब्वे विरुद्ध भारतासाठी एकमेव कसोटी सामना खेळला. त्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने दोन यष्टिचीत केले. ज्यामध्ये एक स्टंपिंग झिम्बाब्वेचा दिग्गज फलंदाज अँडी फ्लॉवरचा होता. ज्याने त्या डावात 115 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावातही त्याने एक झेल घेतला. जेव्हा त्याला फलंदाजीची संधी मिळाली तेव्हा विजयने 25 चेंडूत 30 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्या सामन्यात विनोद कांबळीनेही 227 धावा केल्या होत्या.

या एकमेव कसोटीशिवाय यादवने भारतासाठी 19 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 118 धावा केल्या. विकेटबद्दल बोलायचे तर त्याने 19 खेळाडूंना बाद करण्यात मोलाचा वाटा उचलला. ज्यामध्ये 12 झेल आणि सात स्टंपिंग होते. विजयचे वनडे पदार्पण डिसेंबर महिन्यात 1992 मध्ये झाले होते. 1994 मध्ये कोलकात्याच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध तो शेवटचा भारताच्या जर्सीमध्ये उतरला होता.

भारताकडून खेळण्याव्यतिरिक्त विजयने 89 प्रथम श्रेणी सामनेही खेळले. तो 1987 ते 1999 या काळात व्यावसायिक क्रिकेटमध्ये सक्रिय होता. ज्यामध्ये त्याने 201 च्या सर्वोच्च धावसंख्येसह 3988 धावा केल्या. यामध्ये 237 झेल आणि 46 स्टंपिंगचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-
लहानपणी क्रिकेट खेळण्यावरून मारायचे वडील, आता IPL मधून कमावले करोडो रुपये, वाचा यशोगाथा
झाडू मारण्याचे काम सोडून बनला क्रिकेटपटू; आज आयपीएलमध्ये घालत आहे धुमाकूळ
२८ वर्षीय तरुणीचा ६६ वर्षीय या भारतीय क्रिकेटवर जीव कसा जडला? भन्नाट आहे लव्हस्टोरी
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूने त्याच्याहून २८ वर्षांनी लहान मुलीसोबत जमवले लग्न; नाव वाचून धक्का बसेल