Share

‘तुझं आणि शिवचं काय चाललंय?’ चाहत्याच्या प्रश्नावर भडकली वीणा जगताप; म्हणाली, मी कोणालाही..

Veena Jagtap

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीझनमुळे लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे वीणा जगताप (Veena Jagtap) आणि शिव ठाकरे (Shiv Thakare). शोदरम्यान वीणा आणि शिव यांचे सूर जुळून आले होते. तसेच यांच्या जोडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तर शो मधून बाहेर पडल्यानंतरही अनेकठिकाणी ही जोडी दिसून आली होती. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची चर्चा खूपच रंगली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत आहेत. याबाबत नुकतीच वीणाला तिच्या एका चाहत्याने विचारले असता वीणा चांगलीच भडकलेली दिसून आली.

वीणा आणि शिव ‘बिग बॉस मराठी’चा सीझन संपल्यानंतर अनेकवेळा एकत्र दिसले होते. तसेच दोघांनीही त्यांच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसून आले होते. शिवच्या गावी गेल्यावर वीणाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. एवढेच नाही तर वीणाने तिच्या हातावर शिवच्या नावाचा टॅटूसुद्धा गोंदवला होता. मात्र, मागील बऱ्याच दिवसांपासून वीणा आणि शिवमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरु आहे.

याचे कारण म्हणजे वीणाने तिच्या हातावर असलेल्या शिवच्या नावाचा टॅटू हटवला. काही दिवसांपूर्वी वीणाने एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तिच्या हातावर शिवच्या नावाचा टॅटू दिसला नाही. तेव्हापासूनच चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तसेच दोघेही अनेक महिन्यांपासून एकत्र दिसले नाही. त्यामुळेच या दोघांच्या ब्रेकअफची जोरदार चर्चा रंगली. ब्रेकअप झाल्यामुळेच दोघे आपापल्या कामात व्यग्र झाले, अशीही चर्चा सुरु झाली होती.

https://www.instagram.com/p/CdPbASaqzJ1/?utm_source=ig_web_copy_link

यादरम्यान नुकतीच वीणाने इन्स्टाग्रामवर ‘Ask Me a Question’ हा सेशन घेतला. यावेळी चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. तर वीणानेही सर्वांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. यादरम्यान एका चाहत्याने वीणाला शिवबद्दल प्रश्न विचारले असता ती चांगलीच संतापलेली दिसून आली.

https://www.instagram.com/p/B8QXzcNn-0p/

वीणाला चाहत्याने विचारले की, ‘तुमचं काय चाललंय शिव दादाचं अन् तुझं?’ या प्रश्नावर उत्तर देताना वीणाने म्हटले की, ‘पहिलं आणि शेवटचं. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणालाही उत्तरं द्यायला मी बांधील नाही. नैतिकता बाळगा आणि इतरांना श्वास घेऊ द्या. मी तुमच्या आयुष्याबाबत कधी विचारते की काय चाललंय आणि काय नाही? मी नेहमीच माझ्यापुरतं मर्यादित असते’.

वीणाने तिच्या या उत्तराने चाहत्याला चांगलंच ठणकावलं. तसेच यापुढे तिला कोणी असे प्रश्न विचारले जाणार नाहीत, असाही बंदोबस्त तिने या उत्तराने केला आहे. दरम्यान, वीणा ‘आई माझी काळूबाई’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ यासारख्या मालिकेत दिसून आली. तसेच ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ या मालिकेतही ती दिसून आली होती.

महत्त्वाच्या बातम्या :
मुन्नवर फारूकी ठरला ‘लॉकअप’ शोच्या पहिल्या-वहिल्या सीझनचा विजेता; ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रक्कम
प्रसिद्ध गायिकेवर झाला सामूहिक बलात्काराचा प्रयत्न, म्हणाली, मला गाण्यासाठी बोलावलं आणि…
लॉकअपचा विजेता मुन्नवर फारुकीचे आयुष्य होते वादग्रस्त, कधी रडला तर कधी हसला

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now