बिहारमधील पटनामध्ये एका गायिकेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना अटक केली. घटना रामकृष्ण नगर पोलीस स्टेशन हद्दीतील ज्योती बाबा पथ येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी प्रथम महिला गायिकेला येथे काही कार्यक्रमासाठी गाणे गाण्यासाठी बोलावले.(Attempted gang rape on famous singer)
त्यानंतर कोणत्या तरी बहाण्याने तिला खोलीत नेले आणि तिघांनीही तिच्यासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडवली. त्यांच्या तावडीतून कशीतरी सुटून महिला गायिका दुसऱ्या खोलीत गेली आणि पोलिसांना बोलावले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन गोळ्या जप्त केल्या आहेत.
28 वर्षीय पीडित तरुणी जहानाबादची रहिवासी असून, गायिका मिठापूर येथे राहते आणि सांस्कृतिक कार्यक्रमात गाते. पाटणाचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या माहितीनंतर पोलिसांनी तत्काळ तिन्ही आरोपींना अटक केली. पीडितेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
त्याचवेळी अटक करण्यात आलेल्या तरुणांपैकी एकाने सांगितले की, महिला गायिका आपल्यावर खोटे आरोप करत आहे. आरोपी म्हणाला, गायिका ही माझी पूर्वीपासून मैत्री होती. तिने माझ्याकडून अनेकदा पैसेही घेतले. मी पैसे परत मागितल्यावर तिने नकार दिला. जेव्हा आम्ही तिच्यावर दबाव आणला तेव्हा तिने आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला गोवले आहे.
महत्वाच्या बातम्या-
हॅलो पोलीस! माझा चुलताच माझ्यावर बलात्कार करतोय, मला वाचवा, ३० मिनीटांत आरोपी जेरबंद
युपीत १३ वर्षीय बलात्कार पिडीतेवर पोलिसानेही केले अत्याचार; नोबेल विजेते सत्यार्थी भडकले, योगींना म्हणाले..
त्यामुळे त्याला सकृतदर्शनी बलात्कार म्हणता येणार नाही, न्यायालयाने गणेश नाईकांना दिला अटकपूर्व जामीन
13 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्यानंतर संतापला रितेश देशमुख, म्हणाला, रक्षकच भक्षक झाले तर