Share

“एवढं नक्की सांगतो, पुढच्यावेळी आढळराव पाटील संसदेत असतील”; राऊतांनी कोल्हेंचे टेंशन वाढवले

पुण्यातील आंबेगाव येथे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी क्रिकेटचे सामने आयोजित केले आहे. हे सामने पाहण्यासाठी आढळराव पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना बोलावले होते. यावेळी संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशीही संवाद साधला होता. (sanjay raut on shivaji adhalrao patil)

मी मुंबईचा आहे, पण आजपर्यंत क्रिकेटच्या मैदानात मी कधीच उतरलो नाही. पण मी मैदानात उतरलो तर बँटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि पंचगिरी सर्व करु शकतो, असे संजय राऊतांनी यावेळी म्हटले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला होता.

मी क्रिकेट खेळत नसलो, तरी मला त्यातलं ज्ञान आहे. मला सगळ्या गुगल्या टाकता येतात. कारण बाळासाहेबांची मला शिकवण आहे. शरद पवार साहेबदेखील माझ्यासोबतीला आहे. हे माझे दोन गुरु आहेत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

तसेच पुढील खासदास शिवाजी आढळराव पाटील हेच असतील. काहीही झालं तरी आढळराव पाटील भविष्यात संसदेत दिसतील. कारण एकमेव आढळराव असे नेते आहे, जे पराभवानंतरही आऊटऑफ कव्हरेज गेलेले नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

आज आपल्याकडे इथं खासदार आणि आमदार नाही. म्हणून उमेद हरु नका. कारण आज नाही म्हणून उद्या नसणार असे नाही, हे लक्षात असू द्या. शिवाजी आढळराव हे २४ तास ऍक्टिव्ह असतात. पण शिरुरचे खासदार कधी दिसतात का तुम्हाला? आता महाविकास आघाडी असल्याने मला काही पथ्य पाळावी लागतात, असे म्हणत राऊतांनी अप्रत्यक्षपणे खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.

तसेच जुन्नरच्या बिबट सफारीबद्दल मगापासून बोललं जातंय. मगापासून म्हटलं जातंय की ते पळवलं जातंय. पण हे लक्षात ठेवा की इथे समोर बसलेले आपले दोन पायाचे बिबटे आहे. जे चपळ आहेत. याची जाणीव अजित पवारांना देखील आहे. त्यामुळे ते सबुरीने घेत आहेत. नाहीतर त्यांनाही शिवसेनेच्या बिबट्यांबद्दल माहितच आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
नवनीत राणा एका मोठ्या आजाराने त्रस्त; MRI रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा
दुःखद बातमी: KGF चित्रपटातील फेमस अभिनेत्याचे निधन; माहिती मिळताच चाहत्यांना बसला धक्का
केएल राहुलसोबत लग्नाबाबातच्या बातम्यांवर अथिया शेट्टीने सोडले मौन, म्हणाली, नवीन घरात शिफ्ट..

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now