Share

राज ठाकरेंना धमकी का दिली? युपीतील भाजपा खासदाराने स्पष्टच सांगितलं; “शिवाजी महाराजांच्या…

raj

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच रंगलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे राज यांनी अयोध्या दौऱ्याबाबत केलेल्या घोषणेनंतर मनसैनिक तयारीला लागले आहेत.

मात्र अशातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.

यावरून मनसे नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ब्रिजभूषण सिंह यांना मनसे स्टाईलने प्रत्युत्तर दिले. ‘मनसे छोट्या-मोठ्या धमक्यांना भीक घालत नाही,’ असं म्हणत पानसे यांनी माध्यमांशी बोलताना  ब्रिजभूषण सिंह यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले.

याचबरोबर ‘स्वत:च्या प्रसिद्धिसाठी ब्रिजभूषण सिंह यांनी हा प्रकार केल्याचा गंभीर आरोप देखील पानसे यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना पानसे म्हणाले, ‘ब्रिजभूषण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन गेला असून त्यांना शांत बसायला सांगितले आहे, असा खळबळजनक दावा पानसे यांनी केला.

तर आता खुद्द  ब्रिजभूषण सिंह यांना राज ठाकरे यांना दिलेल्या इशाऱ्यावर सविस्तर भाष्य केलं आहे. याबाबत पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारला होता. याबाबत बोलताना ब्रिजभूषण सिंह म्हणाले, ‘महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजा, शाहू महाराजांसारखे लोक जन्मले.’

‘मात्र त्याच भूमीवर उत्तर भारतीयांना शिवीगाळ करणारा आणि मारहाण करणारा राज ठाकरे नावाचा व्यक्ती जन्मला, असं स्पष्ट मत सिंह यांनी माध्यमांशी बोलताना मांडले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक जातीचे लोक होते. मात्र, त्याच भूमीवर राज ठाकरे मराठी माणूस आणि उत्तर भारतीय असा मुद्दा निर्माण करतात.”

दरम्यान, पुढे राज ठाकरेंना लक्ष करताना ब्रिजभूषण सिंह म्हणतात, ‘२००७ पासून २०२०-२१ पर्यंत राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केली. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आता त्या व्यक्तीचं ह्रदयपरिवर्तन झालंय. आणि ते आज अयोध्येला येत आहेत, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबईत आगीचे तांडव! तब्बल नऊ कंपन्या जळून खाक
VIDEO : नुसरत भरुचाला कंडोम विकताना पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले सडेतोड उत्तर, म्हणाली..
या अभिनेत्यांनी आपल्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत केलाय रोमान्स, कोणी 30 तर कोणी 44 वर्षांनी होतं मोठं
“मला आजही ती भयानक रात्र आठवते, माझ्या आजूबाजूला रक्ताचा अक्षरश सडा पडला होता”

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now