Share

शाहू महाराज ज्या प्रवृत्तींविरोधात लढत होते, ती प्रवृत्ती आपण संपवूया; मुख्यमंत्र्यांनी केली प्रतिज्ञा

राजर्षी शाहू महाराज यांचा आज १०० वा स्मृतिदिन आहे. या दिनानिमित्त त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. अनेक नेते, कलाकारांनी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही राजर्षी शाहू महाजारांना आदरांजली वाहिली आहे. (uddhav thackeray on shahu maharaj)

शाहू महाराजांना आदरांजली वाहताना उद्धव ठाकरेंनी त्यांची स्मृतींना उजाळा दिला आहे. शाहू महाराज हे दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे राजे होते, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच शाहू महाराजांनी ज्या वृत्तीविरोधात संघर्ष केला ती संपवणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

जगात अनेक राजे होऊन गेले आहे. त्यामधील अनेकांची नावेही आपल्याला आठवत नाही. काही राजे फक्त गादीवर बसले होते. पण शाहू महाराज फक्त गादीवर बसणारे राजे नव्हते. ते कधीच गादीवर आरामात बसून राहिलेले नाही. शाहू महाराज हे दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे राजे होते, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

शाहू महाराजांनी अस्पृश्यांना माणसासारखी वागणूक दिली. तसेच अस्पृश्यांना माणसासारखे वागवावे, यासाठी संघर्ष केला, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजांसोबतच्या सांगितलेल्या आठवणींनाही मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला आहे.

शाहू महाराज समाजातील चुकीच्या वृत्तींविरोधात कायमच लढले आहे. आज जातीपातींमध्ये फार असमानता राहिलेली नाही. जिकडे आहे तिथूनही संपुष्टात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण ज्या वृत्तींविरोधात शाहू महाराज लढले, ती वृत्ती आज खरोखरच संपलीये का? असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

या वृत्तीने शाहू महाराजांना का छळलं? तर ते गरीब, दीनदुबळ्यांना मदत करत होते. त्यामुळे आज आपण आपले राजे ज्या प्रवृत्तींविरोधात लढत होते ती संपवण्याची प्रतिज्ञा करुया. तसेच शिवछत्रपतींचा, शाहू महाराजांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करुया, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
सलमानसोबत ईद साजरी करण्यासाठी कंगनाने केला बक्कळ खर्च, आकडा वाचून डोळे होतील पांढरे
महेश भट्टशी लग्न केल्यानंतर सोनी राझदानला झाला होता पश्चाताप? सावत्र मुलीने केला मोठा खुलासा
या अभिनेत्यांनी आपल्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत केलाय रोमान्स, कोणी 30 तर कोणी 44 वर्षांनी होतं मोठं

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now