Share

‘या’ कारणांमुळे राज ठाकरेंच्या नातवाचं नाव आहे खास; जाणून घ्या नाव आणि त्याचा अर्थ

amit thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचं नुकतच बारस झालं आहे.  नुकतंच अमित ठाकरे आणि सून मिताली बोरुडे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. या चिमुकल्याचं नावं ‘किआन’ (Kiaan) असं ठेवण्यात आलं आहे. राज ठाकरेंना नातू झाल्यापासून सोशल मिडियावर नावाची चर्चा सुरू होती.

अखेर आज बारस झालं असून ‘किआन’ (Kiaan) असं राज ठाकरेंच्या नातूच नाव ठेवण्यात आलं आहे. ५ एप्रिल २०२२ रोजी राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. आज राज ठाकरेंच्या नवीन निवासस्थानी म्हणजेच ‘शिवतीर्थावर’ नामकरण विधी पार पडला.

या कार्यक्रमासाठी मोजक्याच नातेवाईकांना कळवण्यात आले होते. तर जाणून घ्या नावाचा अर्थ… ‘किआन’ या नावाचा अर्थ देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असा आहे. ‘किआन’ हे हिंदू धर्मातील नाव आहे. अमित-मिताली यांना पूत्ररत्न झाल्यापासून ‘शिवतीर्थ’वर एक वेगळाच आनंद व्यक्त होत आहे.

मुंबईतच राज ठाकरे यांच्या नातवाचा जन्म झाला आहे, कारण मिताली यांचे सासर आणि माहेर दोन्हीही मुंबईतच आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या नातवाचे फोटो सोशल मिडियावर वाऱ्यागत व्हायरल झाले होते. अमित ठाकरे यांनी बाळासोबतच एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.

दरम्यान, गेल्या 2019 मध्ये धुमधडाक्यात अमित ठाकरे आणि मिताली बोरुडचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. या विवाहसोहळ्याला मोठ मोठ्या राजकिय नेत्यांनी तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे विवाहसोहळ्यात बॉलिवूड कलाकारही आले होते.

अमित ठाकरे आणि मिताली या दोघांच्या लग्नाची तीन वर्षे उलटून गेल्यानंतर त्यांना नुकतच पूत्ररत्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदाने सर्व सीमारेषा पार केल्या आहेत. खास करुन राज ठाकरेंवर पडलेल्या आजोबाच्या जबाबदारीचा त्यांनी हसहसत स्विकार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
UPSC चे माजी सदस्य आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना लाच घेताना रंगेहात पकडले
IPL च्या सामन्यादरम्यान भर स्टेडियममध्ये मुलीनं केलं मुलाला प्रपोज, चाहते म्हणाले, हे आयपीएल आहे की…
तीन महिन्यात पालटले मजुराचे नशीब, खाणीत सापडला दुर्मिळ हिरा, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
‘अजानपेक्षा दुप्पट आवाजात हनुमान चालिसा म्हणणार’; कर्नाटकातील श्रीराम सेनेच्या प्रमुखाची घोषणा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now