जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी समोर येत आहे. आता जमीन खरेदी करताना काही तुकड्यात देखील तुम्ही जमीन खरेदी करू शकता. म्हणजेच आता तुम्हांला , 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार देखील अगदी सहज करता येणार आहे.जाणून घेऊ त्याबद्दल अधिक माहिती.
तीन गुंठ्यांची अट यापुढे आता असणार नाही. आता तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे.
राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून जमीन तुकडाबंदी नियम लागू केले होते. त्यात एन ए 44 जमीन वगळता इतर सर्व घरे, प्लॉट रजिस्ट्री बंद होती. जमिनीचे तुकडे करुनही विकता येत नव्हते. त्याची रजिस्ट्री बंद होती. यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक 44 (1) (ई) हा नियम ठेवला होता.
या नियमामुळे घर आणि जमिनीची विक्री खरेदी व्यवहार नाईलाजानं बॉण्ड पेपरवर व्हायला लागली होती. या विरोधात काही लोकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती त्यावर औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपणार आहे.
जमिनीच्या तुकड्यांमुळे शेती व्यवसाय तोट्यात आहे. शेती विकासाला खीळ बसत आहे. शेती विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेती उत्पादनात सुधारणा करणे, शेतीची उत्पादकता वाढवणे हा प्रमुख उद्देश ठेवून तुकडेबंदी कायदा अंमलात आणण्यात आला होता, त्यावेळी त्याचे स्वागतही करण्यात आले होते.
मात्र, आता ती परिस्थिती राहिली नाही. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी अनेकांना बॅंकांकडून कर्ज मिळत नाही. जे तारण द्यायचे आहे, ते पुरेसे नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे दोन-तीन गुंठे जमीन आहे तिची विक्री करावी म्हटले तर तुकडेबंदी कायद्यामुळे ती करता येत नाही. त्यामुळे पालकांना मोठा अडथळा येत असायचा. मात्र आता नियमात बदल केल्याने पालकही आनंदात आहेत.