Share

‘कितीबी आग लाव, जळणार नाय..’; मराठी अभिनेत्याचा राज ठाकरे आणि भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

सध्या महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे हा विषय प्रचंड तापला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सध्या महाराष्ट्र राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने  यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून त्यावर नेटकरी व्यक्त होत आहेत.

किरण माने नेहमीच विविध मुद्यांवर आपले मत व्यक्त करत असतात. सध्या महाराष्ट्रात चालू असणाऱ्या मशिंदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या विषयावर देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे, यावर त्यांना अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये मशिंदीवरील भोंगे काढण्यासाठी आदेश दिला. त्यानंतर 4 तारखेला अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंगे बंद झाले. दरम्यान राज यांच्यावर औरंगाबाद सभेतील चिथावणीखोर भाषणाबद्दल गुन्हा दाखल झाला. मात्र, या परिस्थितीचा हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये काहीच फरक न पडता एकत्र येऊन आनंदात ईद साजरी झाली.

याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी फेसबुक पोस्ट केली. त्यांनी लिहिले, ‘कितीबी आग लाव, जळणार नाय. ह्यो महाराष्ट्र तुला भावा कळणार नाय! अशा आशयाची त्यांनी पोस्ट केली आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत हिंदू-मुस्लीम अजूनही एकत्र असल्याचे पुरावे दिले. अनेकांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरे आणि भाजपवर निशाणा साधला.

https://www.facebook.com/1460418198/posts/10225167790049428/?app=fbl

तसेच त्यांनी नुकतीच आजोबांनी सांगितलेल्या मशिदीतल्या किर्तनाची गोष्ट पोस्टद्वारे सांगितली होती. या पोस्टला देखील अनेकांनी प्रतिसाद दिला होता. दरम्यान, औरंगाबादच्या सभेतील चिथावणीखोर भाषणाबद्दल राज यांच्यावर गुन्हा दाखल करून महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली.

दुसरीकडे, राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसाचे  पठण करण्याचा आदेश दिल्याने सरकार विरुद्ध मनसे असा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, या दृष्टीने पोलिसांनी खबरदारीचे उपाय योजले आहेत. काल अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंगे बंद झाल्याने धार्मिक तेढ न होता सगळं काही शांततेत पार पडलं.

इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now