केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमी आपल्या वेगवेगळ्या विधानांवरून चर्चेत असतात. महाराष्ट्राने रावसाहेब दानवे यांची अनेक वेगवेगळी रूपे आतापर्यंत पाहिली आहेत. मात्र यावेळेस दानवे चक्क जागरण – गोंधळात तुणतुणे वाजवताना दिसून आले आहेत. त्यांचा हा नवीन अवतार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.
सध्या सोशल मीडियावर रावसाहेब दानवे यांचा तुणतुणे वाजवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ वर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी त्यांचे कौतुकही केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रावसाहेब दानवे यांच्या कार्यकर्त्याच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तुणतुणं वाजवताना… 😅 pic.twitter.com/fGFQHVcIO4
— Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) May 4, 2022
यावेळी कार्यक्रमासाठी रावसाहेब दानवे यांनी उपस्थिती दर्शविली होती. या कार्यक्रमात वाघ्या-मुरळींचा गोंधळ रंगात आला होता. त्यामुळे यामध्ये रावसाहेब दानवे यांनी देखील सहभाग नोंदविला. बराच वेळ वाघ्या-मुरळींचा गोंधळ ऐकल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी तुणतुणे हाती घेतले.
यानंतर त्यांनी तुणतुणे वाजवत जागरण-गोंधळात साथ संगत केली. त्यांचे हे रूप पाहून कार्यकर्ते देखील खूप झाले. बराच वेळ रावसाहेब दानवे तुणतुणे वाजवीताना दिसले. थोड्या वेळानंतर त्यांनी सर्वांना राम राम केला आणि तेथून निघून गेले. दरम्यान आपल्या स्वभावामुळे रावसाहेब दानवे नेहमी चर्चेत असतात.
त्यांचे दिलखुलास वागणे, सडेतोड उत्तर देणे, त्यांचा हसरा स्वभाव, अशा अनेक गोष्टींमुळे ते चर्चेत असतात. यापूर्वी देखील रावसाहेब दानवे असे वेगवेगळे प्रयोग करताना दिसले आहेत. बुलेट, घोडा सवारी, ट्रॅक्टर, बैलगाडी हाकणे, म्हशीचे दूध काढणे अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे, हे मी आधीच सांगितलं होतं, पंकजा मुंडेंची सरकारवर टीका
गौतम अदानींच्या झोळीत आला ‘कोहिनुर ब्रँड’, विदेशी कंपनीकडून घेतले सर्व मालकी हक्क
ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे, हे मी आधीच सांगितलं होतं, पंकजा मुंडेंची सरकारवर टीका
जबरदस्त! रात्री झोपताना हातावर लिहिली ‘ही’ गोष्ट, दुसऱ्या दिवशी फिफ्टी मारून जिंकवला सामना