बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) हा चॅट शो हिंदीतील एक प्रसिद्ध शो आहे. आतापर्यंत या शोचे ६ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर सातव्या सीझनसाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता शोसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. शोचा सातवा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. तसेच कायमस्वरूपी आता हा शो बंद झाला आहे. शोचा होस्ट करण जोहरने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
करण जोहरने त्याच्या इनस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत ‘कॉफी विथ करण’ हा शो पुन्हा कधीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसल्याचे म्हटले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘नमस्कार, कॉफी विथ करण या शोचे ६ सीजन माझ्या आणि तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचे भाग म्हणून राहिले’.
‘मला वाटतं की, या शोद्वारे आम्ही खूप प्रभाव टाकला आहे. तसेच पॉप कल्चरच्या इतिहासात आपले एक स्थान निर्माण केलं आहे. परंतु, आता मला हे घोषित करण्यास अत्यंत दुःख होत आहे की, ‘कॉफी विथ करण’ हा शो आता पुन्हा येणार नाही’.
https://www.instagram.com/p/CdH9wB9okv-/?utm_source=ig_web_copy_link
करणच्या या घोषणेने अनेकांना धक्का बसला आहे. कारण या शोचे प्रत्येक सीझन खूपच हीट झाले आहेत. तसेच हा शो बंद होण्यासंदर्भात आतापर्यंतच कोणत्याच बातम्या किंवा चर्चा समोर आल्या नव्हत्या. तर आता अचानक करणने हा शो पुन्हा प्रसारित होणार नसल्याची घोषणा करताच अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहे.
दुसरीकडे अनेक नेटकरी करण जोहरच्या या घोषणेनंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. तसेच यासंदर्भात सध्या सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. #kofeewithkaran या हॅशटॅगने हे मीम्स सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत.
https://twitter.com/punjabiii_munda/status/1521743315116298240?s=20&t=mR1QvxTRwlmhCCBx1e0bzg
https://twitter.com/MTvalluvan/status/1521737384748261377?s=20&t=jWyah1V7vqHkB47bu437qQ
https://twitter.com/kadak_chai_/status/1521735621147906048?s=20&t=bMyPboQ8qmdxRCVeavcEdA
दरम्यान, ‘कॉफी विथ करण’ हा एक चॅट शो आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज आपली हजेरी लावत असतात. तसेच शोदरम्यान हे सेलिब्रिटी करण जोहरशी संवाद साधत त्यांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टी शेअर करत असतात. १९ नोव्हेंबर २००४ साली या शोचा पहिला भाग प्रसारित झाला होता. त्यानंतर १७ मार्च २०१९ रोजी शोचा शेवटचा भाग प्रसारित झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
धर्मेंद्र हॉस्पिटलमधून परतले घरी; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘मी धडा शिकलोय, तुम्ही ‘ही’ चूक करू नका’
हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत दिसले मिथुन, मुलाने दिली महत्वाची हेल्थ अपडेट, म्हणाला…
दोन वर्षांपूर्वीच राणादाने दिली होती अंजलीबाईंवरच्या प्रेमाची कबुली, साखरपुड्यानंतर ‘ती’ पोस्ट चर्चेत