Share

हृता दुर्गुळेने सोडली ‘मन उडू उडू झालं’ मालिका? स्वतःच खुलासा करत म्हणाली, मी सध्या या मालिकेचे..

Hruta Durgule

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) मागील काही दिवसांपासून माध्यमात चर्चेत आहे. ह्रताने ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडली असून यापुढे आता ती मालिकेत दिसणार नाही, अशा बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. तर आता ह्ताने स्वतः या बातम्यांवर आपले मौन सोडले आहे.

ह्ताने नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ह्रताने ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडली नसून या बातम्या केवळ अफवा असल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही तिने यावेळी चाहत्यांना केले.

ह्रताने म्हटले की, ‘मी ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडली नाही. या केवळ अफवा आहेत. मी सध्या या मालिकेचे चित्रीकरण करत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका’. दरम्यान, ह्ता मालिका सोडणार असल्याचे वृत्त समोर येताच तिचे चाहते नाराज झाले होते. परंतु, आता ह्ताच्या या स्पष्टीकरणाने तिच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

https://www.instagram.com/p/CarZzhSAV6m/

दरम्यान, ह्रताने २४ डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत मुंबईतील एका भव्य हॉटेलमध्ये साखरपुडा केला होता. तिच्या या समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तर आता १७ मे रोजी दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे लग्नासाठी ह्रता मालिका सोडली, अशी चर्चा सुरु झाली होती.

तसेच दुसरीकडे अशाही बातम्या समोर आल्या होत्या की, सेटवरील अस्वच्छतेमुळे ह्रता आणि निर्मात्यांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने ह्ताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. याशिवाय ह्रताच्या आगामी ‘अनन्या’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि नाटकांच्या प्रयोगासाठी ती मालिका सोडत असल्याचेही बोलले जात होते. परंतु, ह्रताने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ ही हृताची पहिली मालिका होती. तिने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पर्दापण केले. मात्र, झी युवावरील ‘फुलपाखरू’ या मालिकेने हृताला घराघरात नेऊन पोहोचवले. तिची ही मालिका खुप जास्त प्रसिद्ध झाली. मालिकांशिवाय ह्रताने नाटकांमध्ये काम केले आहे. ‘दादा एक गुड न्युज आहे’ या नाटकातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

ह्रताचा होणारा नवरा प्रतीक शाह छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तर ह्रताची होणारी सासू मुग्धा शाह या देखील अभिनेत्री आहेत. अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
लग्नाच्या काही दिवसातच कतरिना कैफकडून फॅमिली प्लॅनचा खुलासा; म्हणाली, जेव्हा मला मुलं होतील…
भोजपुरी अभिनेत्रीने धरला चंद्रा लावणीवर ठेका, मराठमोळ्या सौंदर्याने पाडली चाहत्यांना भुरळ
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूने त्याच्याहून २८ वर्षांनी लहान मुलीसोबत जमवले लग्न; नाव वाचून धक्का बसेल

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now