या सभेकडे अवघ्या राज्याच लक्ष लागलं होतं. राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्र समजून घेण्याचा कानमंत्र देत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत इतिहास समजून घेणं महत्वाचं असल्याचं सांगितले. ‘छत्रपती शिवाजी महाराज एक विचार आहे,’ असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. बाबासाहेब म्हणतात की, ज्या दिवशी या लोकांच्या अंगात शिवाजी येईला तेव्हा अख्ख जग पदाक्रांत करू.’ तसेच आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे, असे राज म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘अंगात छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजे, ही आमची मराठेशाही आहे, हा आमचा महाराष्ट्र आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ‘स्वाभिमानाने कसं जगायचं असते आणि काय जगायचं असते हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काल सभेत राज ठाकरे यांनी इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज, अल्लाउद्दीन खिलजी, देवगिरीचा किल्ला, पैठण याचा संदर्भ देत त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीने आपण एक लाख सैनिक घेऊन येणार ही कशी फेक न्यूज होती तेही राज ठाकरेंनी यावेळी सांगितली.
तसेच ‘केवळ 50 वर्षाच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी भव्य काम केले. ‘औरंगजेब प्रेरणेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होता. कारण, छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर प्रेरणा आहे. त्यांचे विचार व प्रेरणा कधीही संपणार नाही, असेही राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.