राणा दाम्पत्याची सुटका नाहीच, कोठडीतला मुक्काम पुन्हा वाढला; ‘या’ दिवशी होणार निकाल

अमरावतीच्या राणा दाम्पत्याचा निकाल न्यायालयाने सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. यामुळे राणा दाम्पत्याचा कोठडीतला मुक्काम पुन्हा वाढला आहे. आता सोमवारी जेल की बेल? यावर फैसला होणार आहे. आज त्यांच्या जामिन अर्जावर काहीही निर्णय झालेला नाही.

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या आव्हानावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. मात्र दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला.

24 एप्रिलपासून राणा दाम्पत्य हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण या सुनावणीत निकाल जाहीर करण्यात आला नाही. निकाल हा सोमवारी जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे. यामुळे आणखी राणा दाम्पत्याचा मुक्काम वाढला आहे.

आता राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारी म्हणजेच 2 मे रोजी सुनावणी होईल. तोपर्यंत राणा दाम्पत्याला कोठडीतच राहावं लागणार आहे. सरकारी वकील प्रदीप वकिल घरत यांनी राणा यांच्या जामीनाला विरोध करत त्यांचे कृत्य लोकशाहीला मान्य होण्यासारखे नसल्याचा दावा केला.

तसेच सरकार कमकुवत होईल, अशा पद्धतीने त्यांचे वर्तन होते. त्यासाठी त्यांनी हिंदू धर्माचे कार्ड खेळले. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या सेनेने आता हिंदुत्व सोडलेले आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्याच्या हेतूने राणा दांपत्याने हे सर्व केल्याचा आरोप घरत यांनी केला.

तर दुसरीकडे राणा दाम्पत्याकडून वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा बाजू मांडत आहेत. राणांवर दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा गुन्हा हा मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हटल्याने दाखल करणे चुकीचे आहे, असा युक्तीवाद राणांच्या वकिलांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
…तेव्हापासून राज माझ्यामागे लागला; शर्मिला ठाकरेंनी सांगीतली लव्हस्टोरी, वाचून चकीत व्हाल
एडल्ट फिल्म शुट करताना उर्फी जावेदला पोलिसांनी रंगेहात पकडलं? जाणून घ्या संपुर्ण सत्य
यशपासून ते महेश बाबूपर्यंत, आपल्याच को-स्टार्सच्या प्रेमात पडले ‘हे’ अभिनेते, काहींनी तर केलंय लग्न
मनसेने आखला मोठा प्लॅन, कार्यकर्त्यांसाठी उभी केली तब्बल २ हजार वकिलांची फौज