2016 मध्ये इजिप्शियन एअरच्या विमानाला अपघात झाला होता. विमानातील सर्व 66 जण ठार झाले. आता फ्रान्सच्या हवाई तज्ज्ञांच्या अहवालात अपघाताचे कारण देण्यात आले आहे. विमानाच्या पायलटच्या सिगारेटच्या तलफीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.(the-pilot-got-a-cigarette-butt-killing-66-passengers-big-revelation)
पायलटने सिगारेट पेटवण्यासाठी लायटर लावला होता. लायटरमधून बाहेर पडलेल्या ठिणगीमुळे कॉकपिटला आग लागली. 134 पानांच्या अहवालात फ्लाइट क्रमांक MS804 च्या पायलटने कॉकपिटमध्ये सिगारेट पेटवली ज्यामुळे इमर्जन्सी मास्कमधून लीक होणाऱ्या ऑक्सिजनला आग लागली. मेंटेनेंस इंजीनिअर्सने ऑक्सिजन मास्क सामान्य वरून आपत्कालीन स्थितीत हलविला होता.
मास्कमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यातून ऑक्सिजन गळती होऊ लागली. पायलट मोहम्मद सईद अली शोकेर(Mohammed Saeed Ali Shoker) याने सिगारेट ओढल्याने हा अपघात झाला. अहवालानुसार, इजिप्शियन पायलट कॉकपिटमध्ये नियमितपणे धूम्रपान करत होता. 2016 पर्यंत एअरलाइनने त्यावर बंदी घातली नव्हती. हा अहवाल पॅरिस येथील न्यायालयात पाठवण्यात आला आहे.
मे 2016 मध्ये एअरबस ए320 विमान पॅरिसहून(Paris) कैरोला जात होते. ते क्रेते बेटाजवळ पूर्व भूमध्य समुद्रात रहस्यमय परिस्थितीत कोसळले. या अपघातात इजिप्तमधील 40, फ्रान्समधील 15, इराकमधील 2, कॅनडातील 2 आणि अल्जेरिया, बेल्जियम, ब्रिटन, चाड, पोर्तुगाल, सौदी अरेबिया आणि सुदानमधील प्रत्येकी एक प्रवासी मृत्युमुखी पडले.
विमान 37000 फूट उंचीवर उडत होते. कार्पाथोस ग्रीक बेटापासून(Carpathos Greek Island) ते 240 किलोमीटर अंतरावर गायब झाले. अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली. विमानाचा ब्लॅक बॉक्स ग्रीसजवळच्या समुद्रात सापडला. अपघाताच्या वेळी इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी हा अपघात दहशतवादी हल्ल्यामुळे झाल्याचा दावा केला होता.