सध्या केंद्र सरकार आयुष्मान भारत स्वास्थ्य कव्हर योजनेचा विस्तार ४० कोटीहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सरकारने जगातील पहिली व्यापक स्वास्थ्य विमा योजना सुरू करण्याच्या दिशेने आपली पावले उचलली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, देशातील १०.७४ कोटी अधिक लोक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये सहभागी झाले आहेत.
या सर्व लोकांना योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा मोफत वार्षिक स्वास्थ्य कव्हर दिला आहे. सरकारने या योजनेमध्ये आणखीन एका जबाबदारीची भर घातली आहे. सरकार आता या योजनेचा विस्तार रिटेल पातळीवर असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नीती आयोगाच्या सहकार्याने या योजनेचा रोड मॅप तयार केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सरकार या योजनेसाठी प्रत्येक कुटुंबामागे जवळपास १,०५२ रु. वार्षिक प्रिमिअम भरत आहे. मात्र आता इथून पुढे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला फक्त २५० रुपये ते ३०० रुपयेपर्यंतचा वार्षिक प्रिमियम भरावा लागणार आहे. जर देशातील ५ कुटुंबांना धरले तर प्रत्येक एका कुटुंबामागे वार्षिक प्रीमियम १२०० ते १५०० रुपये इतके असेल. यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतील.
सध्या या योजनेची पुढील आखणी करण्याचे काम सुरू आहे. लवकरच काही निवडक राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये संपूर्ण देशात विस्तार आखला जाणार आहे. दरम्यान ही योजना ६९ कोटी लोकांना व्यापक पातळीवर हॉस्पीटलायझेशन देत आहे. तर २५ कोटी लोक सामाजिक आरोग्य विमा आणि खासगी स्वैच्छिक आरोग्य विमात कव्हर्ड आहेत. मात्र उरलेल्या ३० टक्के लोकांना या विम्याबदल माहित नाही.
आयुष्मान भारत स्वास्थ्य कव्हर योजनेमुळे ६० टक्के खर्च केंद्र सरकारला तर एकूण खर्चापैकी ४० टक्के राज्य सरकारला खर्च उचलावा लागणार आहे. यामुळे रुग्णाला ५ लाखांपर्यंतचा मोफत उपचार घेता येणार आहे. देशात असे कित्येक नागरिक आहेत ज्यांना जास्त खर्चातील उपचार घेता येत नाहीयेत. त्यामुळेच सरकारचा आयुष्मान भारत स्वास्थ्य कव्हर योजनेचा विस्तार ४० कोटीहून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. या योजनेमुळे महागातील उपचार घेणे नागरिकांना सहज सोपे होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
शेवटच्या चेंडूवर षटकार मारत रशीद खानने अशक्य वाटणारा सामना जिंकवला आणि बनला हिरो
सुंदर बायकोने नवऱ्याच्या बाॅसलाच जाळ्यात अडकवत उकळले लाखो रूपये; पण अति झाल्यावर मात्र…
‘तू फक्त मुनव्वरची अंडरवेअरचं धूत राहा’ लॉकअपमध्ये अंजलीने ‘गटर’ म्हणाल्यामुळे संतापली आजमा; म्हणाली…