कराची विद्यापीठाच्या कॅम्पसमधील चिनी भाषा केंद्राजवळ मंगळवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात तीन चिनी शिक्षकांसह किमान चार जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले. माहितीनुसार, मंगळवारचा स्फोट हा आत्मघातकी हल्ला होता, हा हल्ला एका उच्चशिक्षित महिलेने केला होता.
या बॉम्बस्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. अधिक माहिती म्हणजे, पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची शहरात असलेल्या या विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारती जवळ हा स्फोट झाला आहे.
हा घटनेनंतर प्राथमिक तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला एका बुरखा घातलेल्या महिलेने घडवून आणला आहे. जी चिनी नागरिकांच्या बसची वाट पाहत होती आणि ती जवळ येताच तिने स्वतः ला उडवले. ही महिला बलुचिस्तानच्या तुर्बतमधील नियाझार आबाद येथील आहे.
ही महिला साधारण 30 वर्षांची होती. तिचं नाव शरी बलोचने असून, तिने प्राणीशास्त्रात एमएससी पूर्ण केली होती. तिचा नवरा डॉक्टर आहे. अफगाणिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने जारी केलेल्या निवेदनानुसार, बलोच ही एम फिलचे शिक्षण घेत होती.
So who was #ShariBaloch, the 1st #Baloch woman to carry out a suicide attack?#BLA says The 30 year old joined the group 2 years ago & volunteered herself for “self sacrificing mission”. She had a Masters degree in Zoology & MPhil in education while teaching at a school. pic.twitter.com/nO2usqpyhh
— Bashir Ahmad Gwakh (@bashirgwakh) April 26, 2022
शिवाय ती विज्ञान विषयाची शिक्षिका देखील होती. ती दोन मुलांची आई होती. बंदी घातलेल्या बलुच विद्यार्थी संघटनेच्या सदस्य बीएसओ आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीने बलुच संघटनेने आयोजित केलेल्या निषेधांमध्ये स्वयंसेवक म्हणून भाग घेतला होता. मात्र तिनं कोणत्याही संस्थेचे कोणतेही पद भूषवले नाही.
शरी बलोचच्या पतीने या घटनेनंतर एक ट्विट केले आहे. त्यानं लिहिले आहे की, शरी जान, तुझ्या निःस्वार्थी कृत्याने मला अवाक केले आहे पण आज मी अभिमानाने भारावून जात आहे. महरोच आणि मीर हसन(त्यांची मुलं) हे चांगले व्यक्ती बनतील जे विचार करतील की त्यांची आई किती महान स्त्री होती. तू आमच्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनून राहशील.