Share

‘हिंदूना मिळणारी ‘ती’ सवलत मुस्लिमांना मिळणार का?’; ओवैसींचा भाजपला सवाल

सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या मुद्यावरून महाराष्ट्र राजकारण चांगलेच तापले आहे. यात आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देखील उडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर मुस्लिमांनी कुराण शरीफ वाचल्यास काय होईल, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

म्हणाले, महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मुद्दाम रमजानच्या महिन्यात हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या पवित्र महिन्यात असे मुद्दे उपस्थित केल्याने त्यांचा हेतू स्पष्ट होतो. देशाची अर्थव्यवस्था बिघडवण्याचा त्यांचा डाव आहे, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

देशाच्या अनेक भागात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचा कार्यक्रम आणि दंगलीतील आरोपींच्या घरांवर बुलडोझरद्वारे करण्यात येत असलेली कारवाई यावर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. त्यांनी याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर मुस्लिमांनी कुराण शरीफ वाचल्यास काय होईल, असा सवाल केला.

ओवैसी म्हणाले, भारतीय राज्यघटनेत धोरणाचे निर्देशात्मक तत्त्व नमूद केले आहे. धोरणाच्या निर्देशात्मक तत्त्वांमध्ये बंधुभाव, सर्वांना समान संसाधन अधिकार देण्यासारख्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्यावर कोणीही काहीही बोलत नाही. केवळ मुस्लिमांबद्दल बोलले जात आहे.

हिंदू अविभक्त कुटुंबातील हिंदूंना करात सूट दिली जाते, ती मुस्लिमांना मिळेल का? गृहमंत्री अमित शहा इतर मूलभूत हक्कांबाबत का बोलत नाहीत? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. म्हणाले, संविधानाने देश चालवला पाहिजे. मला जे हवे ते होईल, असे वाटले तर अराजकता येईल.

तसेच यावेळी ओवैसी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. म्हणाले, भाजप अध्यक्ष दिल्लीत घरे फोडण्याबाबत उघडपणे बोलत आहेत. जहांगीरपुरीमध्ये हा सर्व प्रकार घडला असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गप्प बसले आहेत. त्यांच्या घरावर हल्ला झाला की ते आकाश डोक्यावर घेतात.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now