सध्या देशात मशिदींवरील भोंग्यांच्या वादामुळे राजकिय वातावरण पेटले असतानाच दुसरीकडे एका युनिव्हर्सिटी मधील प्राध्यापिकेने भगवान राम यांच्याविरोधात केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे लवली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्राध्यापिका गुरसंग प्रीत कौर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत.
प्राध्यापिका गुरसंग प्रीत कौर यांचा या वक्तव्यासंबंधित ऑडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी, सीतेला पळवून नेण्याची योजना रावणाची नसून रामाचीच असल्याचे सांगितले आहे. तसेच, “रामाला त्याचा शत्रू रावणाला जाळ्यात अडकवायचं होतं” असे त्यांनी म्हणले आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे युनिव्हर्सिटीवर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. याचबरोबर, ‘गुरसंग प्रीत कौर यांना कामावरून काढून टाकण्यात यावे’ या मागणीने देखील जोर धरला आहे. या मागणीच्या जोरावर अपशब्द वापरल्याप्रकरणी प्राध्यापिकेला बडतर्फ करण्याचा आदेश युनिव्हर्सिटीने जारी केला आहे.
यासंदर्भात युनिव्हर्सिटीने एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये त्यांनी, ‘आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, त्यांनी केलेली मतं पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि विद्यापीठ त्यापैकी कोणाचंही समर्थन करत नाही,’ असे नमूद केले आहे. त्याचबरोबर, सोशल मीडियावर शेअर केलेल्या ऑडिओमुळे काही लोक दुखावले गेल्याचे आम्हाला समजले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, प्राध्यापिका गुरसंग प्रीत कौर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक लोकांची मन दुखावली गेली आहेत. त्यामुळे प्रीत कौर यांना माफी मागण्याचे आवाहन सोशल मीडियामार्फत करण्यात आले आहे. मात्र अद्याप प्रीत कौर यांनी माफी मागितल्याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
राणा दाम्पत्याला सलग दुसऱ्या दिवशी कोर्टाचा दणका; आता दिला ‘हा’ निर्णय
‘सोमय्या काय ‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरी ती फोडलीच असती’; अभिनेत्रीकडून शिवसैनिकांचे कौतूक
२४ तास एसी, कूलर, पंखे चालवूनही वीज बिल निम्म्यावर येणार, वापरा ‘या’ खास Tricks
नवनीत राणांना पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याच्या आरोपांवर गृहमंत्री स्पष्टच बोलले, म्हणाले…






