Share

‘सोमय्या काय ‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरी ती फोडलीच असती’; अभिनेत्रीकडून शिवसैनिकांचे कौतूक

kirit

राज्यात लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.

अटक झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी सोमय्या पोहोचले. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोमय्या पोलीस ठाण्यातून निघत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यांच्या कारची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली.

सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर हा वाद आणखीच चिघळला. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी सोमय्या गृहसचिवांची भेट घेण्यासाठी काल दिल्लीला गेले होते. तसेच सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे.

या हल्ल्यानंतर विरोधक राज्य सरकारवर निशाणा साधत आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन केलं आहे. सोमय्या काय त्या कारमध्ये जर मोदी जरी असते तरी शिवसैनिकांनी कार फोडली असती असं खळबळजनक विधान दिपाली सय्यद यांनी केलं.

खोपोली येथे एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “जेव्हा ही घटना घडली त्या परिस्थितीवेळी प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर होता. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. जर तिथं त्या कारमध्ये जर मोदीही असले असते ना तर त्या कारला तसंच फोडलं असतं, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

तसेच बाळासाहेबांची शिकवण आहे जो नडला त्याला फोडला, असंही देखील त्या म्हणाल्या. तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणा यांनी वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. यावेळी नवनीत राणा यांनी पत्रामध्ये राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

याबाबत बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या, ‘नवनीत राणा तुमच्यावर राजद्रोही गुन्हा दाखल आहे. तुम्हाला तिथं नेलं आहे आणि तुम्ही म्हणत असाल मला फाइव्ह स्टारची थाळी आणून द्या, तर तसं होत नाही. जी बाकीच्या लोकांना केली जाते तिच शिक्षा तुम्हालाही केली गेलीय.’

महत्त्वाच्या बातम्या
२४ तास एसी, कूलर, पंखे चालवूनही वीज बिल निम्म्यावर येणार, वापरा ‘या’ खास Tricks
सहा दिवसांत बंद पडली ओलाची स्कूटर, बीडच्या तरुणाने गाढवाला बांधून काढली स्कूटरची धिंड
नवनीत राणांचे आरोप पोलीस आयुक्तांनी खोडले, चहा पितानाचा व्हिडीओच दाखवत दिला पुरावा
चोरट्यांनी चक्क जेसीबीनेच उचलले एटीएम; पहा सीसीटिव्हीत कैद झालेला खतरनाक व्हिडीओ

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now