अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. यावरून दोन गटांमध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणात राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील खार पोलिसांनी याप्रकरणात कारवाई करत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. याप्रकरणी राणा दाम्पत्याला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणा यांनी वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. यावेळी नवनीत राणा यांनी पत्रामध्ये राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार नवनीत राणा यांनी पत्रामध्ये लिहिले आहे की, “मला २३ एप्रिल २०२२ रोजी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस ठाण्यात काढली.”
“मी पिण्यासाठी पाणी मागितले. पण मला रात्रभर पाणी दिले गेले नाही. उलट मला पाणी मागितल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्क देखील नाकारण्यात आला”, असे खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पात्रात म्हंटले आहे.
यावर आता खुद्द गृहमंत्र्यांनी स्वतः चौकशी करून भाष्य केलं आहे. “मी पोलीस ठाण्यातील वागणुकीसंदर्भात चौकशी केली आहे. तशी काही वस्तुस्थिती आहे दिसत नाही. तरीसुद्धा नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. या पत्रावर या घटनेचा तपशील सभापतींनी गृह मंत्रालयामार्फत मागवला आहे. ही माहिती आम्ही त्यांना पाठवणार आहोत,” असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
राज यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये आजपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज यांच्या 1 मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेला पाच दिवस शिल्लक आहे. मात्र अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. याबाबत देखील गृहमंत्र्यांनी भाष्य केलं आहे.
‘राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेच्या परवानगीचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल. औरंगाबाद पोलीस आयुक्त तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील. सभेला परवानगी द्यायची की नाही ते पोलीस आयुक्त ठरवतील. राज्य सरकार ठरवणार नाही, असं वळसे-पाटील यांनी स्पष्टच सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
कार्यकर्त्यांनो..! ठोशास ठोसा असे उत्तर देण्याची तयारी ठेवा; आक्रमक झालेल्या पाटलांचा कार्यकर्त्यांना आदेश
नवनीत राणांचे आरोप पोलीस आयुक्तांनी खोडले, चहा पितानाचा व्हिडीओच दाखवत दिला पुरावा
सोमय्यांवरील हल्ल्याची CISF ने घेतली गंभीर दखल, हल्लेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
फिट ऍन्ड हॅन्डसम असूनही ‘हे’ अभिनेते नाही बनू शकले हिरो, पण खलनायक बनून कमावले नाव






