बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याची बेगम करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांचा लाडका मुलगा तैमूर अली खान (Taimur Ali Khan) नेहमी माध्यमात चर्चेत असतो. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. आताही तैमूरचा एक व्हिडिओ माध्यमात चर्चेत आहे. यामध्ये तैमूर फोटोग्राफर्सवर भडकलेला दिसत आहे.
शनिवारी सैफ अली खान आणि करिना कपूर त्यांच्या दोन्ही मुलांसोबत त्यांच्या मुंबईच्या घराबाहेर दिसून आले. यावेळी करीनाचे काही स्टाफ मेंबर्ससुद्धा तिथे उपस्थित होते. यादरम्यान तैमूरच्या एक क्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, सैफ आणि करीना त्यांच्या मुलांसोबत घराबाहेर दिसताच तिथे उपस्थित काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. त्याचदरम्यान तैमूर फोटोग्राफर्सना म्हणतो की, ‘बंद करो दादा, कॅमेरा बंद करो’.
तैमूरचा हा व्हिडिओ समोर येताच त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. काहींनी हा व्हिडिओ पाहून तैमूरला क्यूट म्हटले तर काहींनी यावरून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले की, ‘क्यूट’. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘खूपच उद्धट मुलगा आहे तैमूर’.
काहींनी तर हा व्हिडिओ पाहून करिना आणि सैफच्या संस्कारावरही प्रश्न उपस्थित केले. एकाने लिहिले की, ‘जशी करीना तसा मुलगा’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘आई-वडिलांनाच संस्कार नाहीत’. दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने शेअर केले खास फोटो; म्हणाला, ही आहेत माझी खास माणसं
‘RRR’ आणि ‘KGF 2’ च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘यात चित्रपट कुठंय?’
कपिल शर्माने तो प्रश्न विचारताच भडकला अजय देवगण, म्हणाला, तुझ्यापेक्षा तर जास्तच नंबर..






