बॉलिवूडची ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) नुकतीच आई झाली आहे. १९ एप्रिल रोजी काजलने एका गोंडस मुलाला जन्म दिला. यासंदर्भात काजलचा पती गौतम किचलूने सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. यासोबतच त्याने मुलाच्या नावाचीही घोषणा केली होती. त्यानंतर आता काजलने एक पोस्ट शेअर करत मुलाच्या जन्मानंतरचा तिचा अनुभव सांगितला आहे.
काजलने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या मॅटर्निटी शूटदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझा मुलगा नीलचे या जगात स्वागत करण्यासाठी खूपच खूश आणि उत्साही आहे. मुलाला जन्म देणे एक आनंददायी, अद्भुत, मोठी प्रक्रिया असली तरीही हा सर्वात समाधानकारक अनुभवसुद्धा असतो’.
‘हा… पण हे तितके सोपे नव्हते. तीन रात्र मी झोपू शकले नाही. सकाळी ब्लिडींग होणे, पोटात दुखणे, ताणलेली त्वचा, फ्रोझन पॅड्स, ब्रेस्ट्स पंप, अनिश्चितता, आपण हे योग्य करत आहोत का? याची सतत काळजी वाटणे, नैराश्य असं सर्व काही एकाच वेळी घडत होतं. भीतीसुद्धा वाटत होती. पण या सर्वांमध्ये काही आनंदाचे क्षणसुद्धा होते. नीलच्या जन्मानंतर मला सर्वकाही सुंदर वाटत होतं’.
काजलने पुढे म्हटले की, ‘नीलला सकाळी सकाळी गोड मिठी मारणे, एकमेकांच्या डोळ्यात आत्मविश्वासाने पाहणे, प्रेमाने त्याचे चुंबन घेणे, खोलीत आम्ही दोघेच असतानाचे शांत क्षण असे सर्वकाही सुंदर वाटत होतं. एकमेकांना आम्ही ओळखत आहोत, पुढे जात आहोत, शिकत आहोत आणि या सुंदर प्रवासात एकत्र पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. वास्तवात प्रसूतीनंतरचा काळ ग्लॅमरस नसतो पण सुंदर मात्र नक्कीच असू शकतो’.
दरम्यान, काजलने बिजनेसमॅन असलेल्या गौतम किचलूसोबत ३० ऑक्टोबर २०२० रोजी लग्न केले होते. त्यानंतर १ जानेवारी २०२२ रोजी ती नववर्षाच्या निमित्ताने तिच्या प्रेग्नेन्सीची घोषणा केली होती. तिने सोशल मीडियावर पती गौतमसोबतचा एक फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. तर आता ते दोघे आई-बाबा झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
४५ वर्षांच्या वयातही हॉट दिसते ‘आओ राजा’ गाण्यातील चित्रांगदा, सुंदर दिसण्यासाठी पिते ‘हे’ खास ड्रिंक
सुशांत सिंह राजपूतपासून ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत, या कलाकारांनी मृत्यूनंतर दान केली त्यांची संपत्ती
रिंकू राजगुरूच्या पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो पाहून चाहत्यांना झाली श्रीदेवीची आठवण; म्हणाले, कडक आर्ची