Share

‘त्या’ वाईट कामातून मिळालेला सगळा पैसा दान करणार; अक्षयकुमारची मोठी घोषणा

बॉलिवूडमधील खतरो का खिलाडी म्हणून ज्याला ओळखले जाते तो म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या जाहिरातीमुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. त्यावर आता अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांची माफी मागितली आहे.

अक्षय कुमार नेहमी सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती करताना दिसतो. आपल्या अनेक जाहिरातीमधून त्याने लोकांना आरोग्यासंबंधित जागरूकतेचा संदेश दिला आहे. त्याच्या या जाहिरातींना लोकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला. मात्र, आता दुसरीकडे अक्षय कुमारने केलेल्या पान मसालाच्या जाहिरातीमुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

अक्षयने समाजासाठी अहितकारक ठरणाऱ्या अशा जाहिराती स्वीकारू नयेत, अशी चाहत्यांची इच्छा आहे. या पान मसाला जाहिरातीमुळे अक्षयला त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. अनेकांनी अक्षयला प्रतिक्रिया देत अशा जाहिराती न करण्याचा संदेश दिला.

अक्षय कुमार पान मसालाच्या जाहिरातीत झळकला आणि दुसरीकडे अल्लू अर्जुनने अशाच एका जाहिरातीची ऑफर नाकारल्यामुळे या दोन्ही सुपरस्टार्सच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक घमासान झालं. यानंतर, आता अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांची माफी मागितली आहे.

त्यानं लिहिले आहे की,  मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. काही दिवसांपासून तुमच्या प्रतिक्रियांचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. मी कधीही तंबाखूला प्रोत्साहन दिलं नाही आणि यापुढेही देणार नाही, असे त्यानं लिहिले.

तसेच लिहिले, विमल इलायचीच्या जाहिरातीवर तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे अतिशय नम्रतेने मी यातून माघार घेत आहे. या जाहिरातीतून मिळालेला सगळा पैसा मी एका चांगल्या कामासाठी खर्च करेन. तथापि, माझ्या कराराची कायदेशीर मर्यादा पूर्ण होईपर्यंत हा ब्रँड भविष्यातही ही जाहिरात प्रसारित करत राहील.

https://twitter.com/akshaykumar/status/1516862694833360897?t=opUlBJJ6sdMuRzl3-2-yuQ&s=19

परंतु, मी तुम्हा सर्वांना वचन देतो की, मी माझी पुढील कामं काळजीपूर्वक निवडेन, आणि त्या बदल्यात, तुमचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासोबत कायम राहाव्यात, अशी इच्छा व्यक्त करतो. अक्षय कुमारने चाहत्यांना अशा आशयाची पोस्ट करत माफी मागितली आहे.

आरोग्य बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now