दिल्लीमध्ये जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी दोन गटात हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारानंतर दिल्ली महापालिकेने याठिकाणी असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली आहे. पालिकेने जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकाम बुलडोझरच्या साह्याने काढून टाकले आहे. त्यामुळे येथील दुकानदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यावेळी पोलिसांच्या चौकशीदरम्यान एका हिंदू दुकानदाराने सांगितले आहे की, आम्ही गेल्या ६० वर्षापासून याठिकाणी दुकाने चालवत आहोत. यापूर्वी पालिकेने कधीच असे केले नाही. मात्र आता हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारामुळे पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमचे सर्वकाही या वादात उद्ध्वस्त झाले आहे.
तसेच, “आम्ही गेले कित्येक वर्षे या ठिकाणी मिळून – मिसळून राहत आहोत. हिंदू असो किंवा मुसलमान आम्ही कधीच वेगळे राहिलो नाही. पालिकेने या कारवाईची कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. आता रोजगार गेलेल्या मुलांनी काय करावे? मी एक हिंदू आहे माझ्यापेक्षा ही कोणी मोठा हिंदू असेल.” अशा शब्दात या दुकानदाराने आपला राग व्यक्त केला आहे.
यासोबतच त्याने म्हणले आहे की, गेल्या पंधरा वर्षापासून मी दुकान चालवत आहे. याअगोदर पालिकेने माझ्या दुकानाला कधीच अवैध म्हणजे नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार झाल्यानंतरच पालिकेने हिंदू आणि मुसलमानांच्या दुकानांवर बोट उचलण्यास सुरुवात केली आहे.
या दुकानदारासोबत असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली आहे की, येथील दुकानांना काही कारण नसताना तोडण्यात येत आहे. यामुळे वाद निर्माण नाही होणार का? हनुमान जयंतीदिवशी निघालेली मिरवणूक विना परवानगी शिवाय काढण्यात आली होती. यामुळेच वादाला सुरुवात झाली.
दरम्यान जहांगीरपुरी भागात बनलेल्या एका मंदिराच्या जवळील अनधिकृत बांधकामाला देखील स्थानिकानी विरोध दर्शविला आहे. यावेळी एका व्यक्तीने “माझ्या अंगावरुन बुलडोझर घाला पण बांधकाम तोडू नका” असे अधिकाऱ्यांना म्हटले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीतील जहांगीरपुरी भागातून हनुमान जन्मोत्सवाची मिरवणूक निघाली होती. मिरवणूक जहांगीरपुरी भागातील कुशल सिनेमा जवळून जात असताना दोन समाजांच्या गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर दंगलीत झाले. यावेळी काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक देखील केली. या दंगलीत गोळीबार देखील करण्यात आला. या पार्श्वभुमीवर दिल्ली पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
संतापजनक! 13 वर्षीय चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांकडून बलात्कार, पोलिसांची मोठी कारवाई
प्रसिद्ध भोजपुरी गायिकेचा MMS झाला लीक, गायिकेने लोकांना शेअर न करण्याचे केले आवाहन
बेकायदेशीर बांधकाम तोडत होते अधिकारी; कम्युनिस्ट नेत्याने दिले बुलडोझर थांबवण्याचे आदेश, म्हणाल्या…
‘…मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट’; सुधीर मुनगंटीवारांचा नवा नारा






