Share

खाल्ल्या मिठाला जागा..; सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना जाहीर सुनावले; सुळे असं का म्हणाल्या? वाचा..

supriya sule

सध्या राज्यामध्ये हनुमान चालीसा (Hanuman Chalis) व भोंगा यावरून मोठा वाद सुरू आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे म्हणतात, ‘देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा,३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे.’

भोंगा वादावरून शिवसेना – मनसे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या वादावर थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्यावर भाष्य करत राज ठाकरेंना सुनावले आहे.

या बाबत सुळे इंदापूरात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मराठीवर खरंच प्रेम असेल तर त्या खाल्ल्या मिठाला जागा, महाराष्ट्राची बदनामी करू नका,’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ‘तुम्हाला जे भाषण करायचे ते करा पण आम्हाला कामे द्या, महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही आणि जर कोणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही,” अशा स्पष्ट शब्दात सुळेंनी राज ठाकरेंना गर्भित इशारा दिला आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये बोलताना सुळे यांनी राज यांच्या आगामी भाषणावर भाष्य केलं आहे.

दरम्यान, याबाबत औरंगाबादमध्ये बोलताना त्या म्हणाल्या, ‘लोकं लोकांचं करतील आपण आपलं करायचं ना, तो येऊन भाषण देऊन जाईल, तुम्ही तुमचं काम करा, इतकं महत्व देताच कशाला?,” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या सभेसंदर्भात बोलताना उपस्थित केला.

तसेच औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळे यांनी चांगलीच राज ठाकरेंची खिल्ली उडवल्याचं पहायला मिळालं. ‘येईल, भाषण देईल आणि जाईल, थोडा एंटरटेन्मेंट भी होना चाहिए यार. थोडं एंटरटेन्मेंट पण होऊ द्या ना. रोज दुर्दर्शन कशाला पहायचं?, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.

महत्त्वाच्या बातम्या
सोशल मिडीयावरून जातीय तेढ पसरवणाऱ्या पोस्ट करणे महागात पडणार; पोलीसांची करडी नजर
या सरकारला कारवाई करण्यासाठी माझंच घर दिसतं, हे बेकायदेशीर भोंगे यांना दिसत नाही; राणे संतापले
अमित शहा इन ऍक्शन मोड! हिंसा करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई, दिले ‘हे’ आदेश
‘या’ कंपनीच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका, ९ टक्क्यांनी शेअर कोसळल्यानंतर हजारो कोटींचे नुकसान

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now