Share

तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा मालक आहे केएल राहुल, पाच अभिनेत्रींवर आहे फिदा, आई-वडिल आहेत प्रोफेसर

लोकेश राहुलने (Lokesh Rahul) आयपीएलमधील (IPL) आपल्या 100व्या सामन्यात शानदार शतक झळकावले. यासह राहुल हा 100व्या आयपीएल सामन्यात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. कर्णधारपदाखाली राहुलने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मात देत शानदार विजय मिळवला. केएल राहुलने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार मारले.(KL Rahul’s parents are professors)

राहुलने पूर्ण 20 षटके फलंदाजी केली आणि संघाचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतला. केएल राहुलने 60 चेंडू खेळून नाबाद 103 धावांची खेळी केली. केएल राहुलच्या खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 181 धावाच करू शकला.

लखनौ संघाचा कर्णधार राहुलचा जन्म 18 एप्रिल 1992 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे केएन लोकेश आणि राजेश्वरी यांच्या घरी झाला. राहुलचे वडील सुरतकल, मंगलोर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटक येथे प्राध्यापक आणि माजी संचालक आहेत. त्याच वेळी, राहुलची आई राजेश्वरी मंगळूर विद्यापीठात इतिहासाच्या प्राध्यापक आहेत.

लोकेश राहुलने NITK मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्याचे सर्व लक्ष क्रिकेटकडे वळवले. के.एल. राहुलची एकूण निव्वळ संपत्ती 10 दशलक्ष USD असण्याचा अंदाज आहे, जे भारतीय चलनात अंदाजे रु. 75 कोटी भारतीय रुपये आहे. राहुलच्या आवडत्या अभिनेत्री अनुक्रमे ऐश्वर्या राय, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, स्कारलेट जोहानसन आहेत. चाहत्यांमध्ये राहूलचेही प्रचंड क्रेझ आहे.

आतापर्यंत 16 क्रिकेटपटूंनी वनडे पदार्पणात शतक झळकावले आहे, पण भारतासाठी असे करणारा राहुल एकमेव फलंदाज आहे. राहुलने 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात 115 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या होत्या. राहुलने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये राहुलने 46.69 च्या सरासरीने 1,634 धावा केल्या आहेत ज्यात पाच शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-
केएल राहुलचे शतक पाहून, सासरे सुनील शेट्टी स्वत:ला रोखू शकले नाहीत; म्हणाले
के एल राहुलच्या मते हा खेळाडू आहे भारताचा एबी डिविलीयर्स; म्हणाला, ३६० डिग्री शॉट्स खेळण्यात सक्षम
मेरा ढोला नी आया ढोला सारा तेंडूलकर मॅच पाहायला आल्यानंतर शुभमन गिल झाला ट्रोल, पहा मीम्स
पुढील सामन्यात विराट कोहली मोठी खेळी खेळेल का? राहुल द्रविड म्हणाला, एक वेळ अशी येते की..

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now