लाफ्टर क्वीन भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांचे घर गजबजले आहे. दोघांनी एका मुलाचे स्वागत केले आहे. आजकाल भारती आणि हर्ष नवजात बाळामध्ये व्यस्त आहेत, परंतु त्याच वेळी दोघांनाही कोणत्याही परिस्थितीत कामाची बांधिलकी पूर्ण करायची आहे, त्यामुळे प्रसूतीनंतर अवघ्या 12 दिवसांनी भारती तिच्या कामावर परतली आहे.(Bharti Singh shared his grief after starting work immediately )
साहजिकच प्रसूतीनंतर लगेच कामावर परतणे तिच्यासाठी सोपे नव्हते. यामागे केवळ मुलाला सोडून कामावर परतणे हेच नाही तर लोकांच्या विविध गोष्टींनीही भारतीला त्रास दिला. भारतीने आता खुलासा केला आहे की, वर्किंग मॉम असल्यामुळे लोकांनी तिच्यावर अनेक कमेंट्स केल्या आणि तिची टिंगल उडवली. भारतीने तिला सहन करायला लागलेल्या लोकांच्या कमेंटबद्दल खुलासा केला आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारती सिंगने खुलासा केला की, ती नोकरी करणारी आई असल्याने तिला अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. भारती या मुलाखतीत म्हणाली की, ‘लोक म्हणतात की मूल लहान आहे आणि लगेच कामावरही परतली आहे. पैशाची काय गरज आहे. पण, अशा काही कामाच्या कमिटमेंट्स होत्या ज्यामुळे तिला कामावर परतावे लागले.
भारती सिंह म्हणाली की, तिच्या कामावर परतल्यामुळे लोकांनी तिला खूप सल्ले दिले. भारती असेही म्हणाली की ती एकटीच नाही जिने संपूर्ण प्रेग्नेंसी दरम्यान काम केलं किंवा प्रसूतीनंतर लवकरच कामावर परतले. ती म्हणाली की, तुम्हाला अनेक गरोदर महिला सिग्नलवर काम करताना दिसतील. अनेक महिला प्रसूतीनंतर लगेच काम करतात. मी पण काही राजकुमारी नाही. मला फक्त कामाची गरज आहे. लोक चार गोष्टी म्हणतील, पण सत्य तेच जाणतात ज्याच्यावर वेळ येते.
शूटिंगदरम्यान ती मुलावर कशी नजर ठेवते हे देखील भारती सिंहने सांगितले. ती म्हणाली, मी स्वतः कॅमेऱ्यातून बाळाला पाहत राहते. तो हालला तरी मला नोटिफिकेशन मिळते. पण, अशा अनेक माता आहेत ज्यांना ही सुविधा नाही. आता लक्षात येते की आपल्या सर्वांच्या आया पण किती अस्वस्थ झाल्या असतील.
भारतीने असेही सांगितले की ती नकारात्मक गोष्टींकडे किंवा लोकांच्या टोमण्याकडे जास्त लक्ष देत नाही. ती म्हणाली, मी लक्ष द्यायला सुरुवात केली असती तर नऊ महिने काम करणे कठीण झाले असते. यासोबतच भारतीने आता तिचे आयुष्य किती बदलले आहे हेही सांगितले. भारती म्हणाली, मी आता फार कमी इंस्टा चेक करते. मी कमी वेळात आंघोळ करून येते आणि मुलासोबत जास्तीत जास्त राहते. त्याने दूध प्यायले का? किती वेळ झोपला, हेच माझ्या मनात चालू असते.
भारती सिंग सध्या तिचा पती हर्षसोबत ‘हुनरबाज-देश की शान’ होस्ट करत आहे. याशिवाय ती ‘द कपिल शर्मा शो’मध्येही दिसते. मात्र, प्रेग्नेंसीमुळे ती काही काळ द कपिल शर्मा शोपासून दूर होती. मात्र तिला पुन्हा त्या शोमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
रात्रभर त्रास सहन करत राहिली भारती सिंग, लेबर पेन होत असतानाही या कारणामुळे केला व्हिडीओ शुट
भारती-हर्षच्या बाळाची पहिली झलक आली समोर; रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ झाला व्हायरल
भारती सिंह आणि हर्ष आपल्या चिमुकल्याला घेऊन परतले घरी, बाळाची पहिली झलक पाहून म्हणाल क्युट
VIDEO: करण जोहरने भारती-हर्षच्या मुलाला लॉन्च करण्यास दिला नकार, मग सलमानने घेतला पुढाकार