Share

VIDEO: एअरपोर्टवर उर्फी जावेदला आली तोंड लपवण्याची वेळ, नेटकरी म्हणाले, पुर्ण कपडे घातल्यामुळे..

फॅशन स्टार उर्फी ​​जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या विचित्र आणि बोल्ड फॅशन सेन्सने सर्वांना मंत्रमुग्ध करते. उर्फीचे सर्व लूक बाहेर येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. उर्फीला तुम्ही आतापर्यंत एकापेक्षा एक ग्लॅमरस लूकमध्ये पाहिले असेल. पण तुम्ही उर्फीला कधी मेकअपशिवाय पाहिले आहे का? नसल्यास, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे.(At the airport, it was time for Javed alias Javed to hide his face)

वास्तविक, उर्फी नुकतीच पुन्हा एकदा विमानतळावर स्पॉट झाली. मात्र यावेळी उर्फी कोणत्याही रिवीलिंग कपड्यांमध्ये नाही तर साध्या ड्रेसमध्ये दिसली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी उर्फी एअरपोर्टवर नो मेकअप लूकमध्ये दिसली. आपल्या स्टायलिश आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी सध्या तिच्या नो मेकअप लूकमुळे चर्चेत आहे.

मेकअपशिवाय उर्फी केसात तेल घालून विमानतळावर पोहोचली. उर्फीला विना मेकअप लूकमध्ये ज्याने पाहिले तो थक्क झाला. उर्फीला पाहून पापाराझींनी नेहमीप्रमाणे तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. पण नेहमी बिंदास आणि मस्त पोज देणारी उर्फी जावेद नो मेकअप लूकमध्ये पापाराझी टाळताना दिसली. उर्फीने अनेकदा जॅकेटने चेहरा लपवण्याचाही प्रयत्न केला.

विना मेकअप लूकमधील उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्फीला पूर्ण ड्रेसमध्ये पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. एका यूजरने लिहिले की, मी काय पाहतोय? पूर्ण ड्रेस? नाही, हे कधीच होऊ शकत नाही. दुसर्‍या युजरने लिहिले की, पहिल्यांदा तिने पूर्ण कपडे घातले आहेत त्यामुळे ती चेहरा लपवत आहे.

बरं, उर्फीने काहीही केलं तरी ती चर्चेत येते असंच म्हणावं लागेल. मेकअप असो किंवा विनामेकअप लूक असो, लोक उर्फीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. आता यापुढेही उर्फी साध्या लुकमध्ये दिसणार की, पुन्हा उर्फीचा जलवा पाहायला मिळणार. उर्फीच्या या लूकबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?

महत्वाच्या बातम्या-
उर्फी जावेदला फराह खानने दिला नीट कपडे घालण्याचा सल्ला, उर्फीनेही दिले सडेतोड उत्तर, म्हणाली..
नुसरत भरुचाने केली बोल्डनेसची हद्दपार, तिचा हटके लूक पाहून चाहते उर्फी जावेदलाही विसरले
कामाच्या बदल्यात मागितला सेक्शुअल फेवर; उर्फी जावेदचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप
नुसरत भरुचाने केली बोल्डनेसची हद्दपार, तिचा हटके लूक पाहून चाहते उर्फी जावेदलाही विसरले

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now