बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील एका तरुणीची तिच्याच प्रियकराने वेश्याव्यवसायात विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणीचा फायदा घेत या प्रियकराने तिला रौटा बाजार विकून टाकले होते. परंतु याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तरुणीची सुटका केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून तरुणी रेड लाईट एरियात सुटकेची आस लावत आपले आयुष्य जगत होती. याप्रकरणी पोलिसांनी रेड लाईट एरियाच्या ऑपरेटरला अटक केली आहे. तसेच त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. सध्या तरुणी पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे तिला देखील धीर मिळाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रौटा बाजारातील रेड लाईट परिसरात एका तरुणीकडून जबरदस्तीने काम करून घेत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे या तरुणीची आणि इतर महिलांची सुटका करण्यासाठी एसडीपीओ आदित्य कुमार यांनी डीएसपी आनंद मोहन गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली.
या टीमने मंगळवारी सायंकाळी रेड लाईट परिसरात धाड टाकली. यावेळीच पोलिसांनी तरुणीची सुखरूप सुटका केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या तरुणीला गेल्या तीन वर्षांपूर्वी रेड लाईट परिसरात आणले गेले होते. याठिकाणी तिच्याकडून बळजबरीने काम करून घेण्यात आले. तिने अनेकदा यातून बाहेर पडण्यासाठी विनंती केली. मात्र तिला कोणीच मदत केली नाही.
यानंतर तिने आपले प्रयत्न बंद केले. शेवटी पोलिसांना याची माहिती लागताच त्यांनी तरुणीची सुटका केली आहे. ही तरुणी पश्चिम बंगालची रहिवासी आहे. ती आपल्या प्रियकरावर विश्वास ठेवून घर सोडून बिहारमध्ये आली होती. परंतु याच प्रियकराने तिच्या देहाची विक्री केली आणि तो फरार झाला.
दरम्यान सध्या पोलीस तरुणीला वेश्याव्यवसायात आणणाऱ्या प्रियकराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी रेड लाईट एरियाची ऑपरेटर तमन्ना हिला अटक केली आहे. तिच्याकडून आरोपीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. तर तरुणीची आरोग्य तपासणी झाल्यानंतर आणि तिच्यावरील उपचार संपल्यानंतर पोलीस तिला सुखरूप तिच्या घरी सोडविणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
आलिया-रणबीरने लग्नात घेतले फक्त ६ वचन, ७ वे वचन घेताना महेश भट्टने रोखले, पंडितालाही झापले
‘या ‘ पेनी स्टॉकने ग्राहकांना दिला बंपर रिटर्न; 18 महिन्यात 1 लाखाचे झाले थेट 18 लाख
हॉलिवूड स्टारवर माजी पत्नीने केले गंभीर आरोप; म्हणाली, त्यादिवशी तो राक्षस झाला अन् माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये…
सगळे दिग्गज फेल झाल्यानंतर ‘हा’ तरुण खेळाडू तारणार मुंबईच्या संघाला; मिळू शकते संघात स्थान