दरम्यान, भोंग्यांवरून झालेल्या वादानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) या मुस्लिम संघटनेने राज ठाकरे यांना धमकी दिली आहे. पीएफआयचे मुंब्य्रातील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी ही धमकी दिली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळणार यात काही शंका नाही.
याबाबत बोलताना मतीन शेख यांनी सांगितले की, ‘मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. काही लोक मुंब्य्रातील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच भोंग्यावरून होणाऱ्या अजानबाबत त्यांनी सांगितले की, एकाही भोंग्याला हात लावला तर पीएफआय सर्वात समोर असेल.
दरम्यान, ‘छेडोगे तो छोडेंगे नही’ हे आमचे घोषवाक्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ‘देशामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, आमच्या वाटेला आलात तर सोडणार नाही हा आमचा नारा आहे, असे म्हणत त्यांनी थेट राज ठाकरेंना धमकी दिली आहे. तसेच याबाबत पीएफआयने मुंब्रा पोलिसांना पत्रकही देण्यात आले आहे.
तर दुसरीकडे यावर आता मनसेने देखील प्रतिउत्तर दिलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेच्या एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्रभर तांडव होईल आणि त्याची जबाबदारी शासनाची असेल, असा इशाराही देशपांडे यांनी यावेळी दिला आहे.
देशपांडे म्हणाले की, ‘मुंबई पोलीस कायद्यातील तरतुदीनुसार तुम्हाला 365 दिवस भोंगे लावता येणार नाहीत. हा कायदा आहे आणि या कायद्याचं पालन व्हावं. जे लोक कायद्याचं पालन न करता आम्हाला धमक्या देत असतील तर त्याची जबाबदारी शासनाची आहे.’