Share

लग्नात एकमेकांना किस करताना दिसले रणबीर-आलिया, फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहतेही हैराण

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर विवाहबंधनात अडकले आहेत. मिसेस कपूर झाल्यानंतर आलियाने तिच्या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जो पोस्ट होताच व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये आलिया आणि रणबीर एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. या दोघांचा फोटो पाहून चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे.

आलिया आणि रणबीरने त्यांच्या लग्नात पांढरे कपडे घातले आहेत. दोघांनीही आपापल्या खास ठिकाणी सात फेरे घेतले आहे. फोटो शेअर करताना आलियाने लिहिले आहे की, आज, आमच्या कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींमधील आमच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच बाल्कनी जिथे आम्ही आमच्या नात्याची शेवटची 5 वर्षे घालवली तिथे आम्ही लग्न केले.

आमच्या मागे आधीच खुप काही आहे. आम्ही एकत्र आणखी आठवणी बनवण्यासाठी आणखी प्रतिक्षा करू शकत नाही. आलिया आणि रणबीरने त्यांच्या घरी वास्तूमध्ये लग्न केले. दोघेही अनेक वर्षांपासून या घरात एकत्र राहत होते. लग्नाची सर्व कार्येही याच घरात पार पडली आहेत.

आलिया आणि रणबीरच्या लग्नाला संपूर्ण कपूर कुटुंबाने हजेरी लावली होती. यासोबतच करण जोहरही लग्नाला पोहोचला होता. आलिया-रणबीर गेल्या ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. ब्रह्मास्त्रच्या सेटवर दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. आलिया आणि रणबीर लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये एकत्र दिसणार आहेत.

या चित्रपटातून दोघांचा लूक समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या लग्नाची वाट पाहत होते. आता त्यांचे लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये दोघे खुप सुंदर दिसत आहेत. एका फोटोमध्ये तर दोघेही एकमेकांना लिप टू लिप किस करताना दिसत आहेत.

अनेक दिग्गज कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नातील एक व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये सगळ्यांना एक ड्रेस कोड देण्यात आला होता असा दावा करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत होते. आता लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

महत्वाच्या बातम्या
वर्ल्ड कपच्या विजयाचे श्रेय धोनीला दिल्याने भज्जी भडकला, म्हणाला, बाकीचे दहा जण काय..
बेबी एबीमध्ये दिसली खऱ्या एबीची झलक, मारला सगळ्यात लांब षटकार, पहा जबरदस्त व्हिडीओ
लैंगिक सुखासाठी कायपण! प्रायवेट पार्टमध्ये अडकला २ किलोचा डंबल, डॉक्टरांनी हात घालून काढला बाहेर
राष्ट्रवादी विरूद्ध भाजप वाद पेटला, फडणवीसांनी सलग १४ ट्विट करत शरद पवारांवर केले गंभीर आरोप, म्हणाले..

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now