काही दिवसांपूर्वी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर मनसेत नाराजीनाट्य सुरू झाले आहे. तसेच राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच्या ठाणे येथील सभेत भोंगे हटविण्याची अंतिम मुदत दिली आहे.
ठाणे येथील सभेतही ठाकरे हे आपल्या विधानावर ठाम राहील्याने कल्याणमधील नाराज झालेले पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरूवारी मनसे प्रदेश सचिव आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. सचिव इरफान शेख यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला आणखी एक धक्का बसला आहे.
ठाण्यात बोलताना राज ठाकरेंनी भोंग्याबाबतची भूमिका कायम ठेवल्याने इरफान शेख यांनी राजीनामा देण्याचा टोकाचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर शेख यांनी राजीनामा सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या निर्णयाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तसेच अत्यंत भावूक होत शेख यांनी हा राजीनामा दिला असून आपण ज्या समाजातून येतो त्याच समाजाच्या विरोधात पक्षाध्यक्ष द्वेषात्मक भूमिका घेत असतील तर समाजासाठी पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ आली असल्याची भावना यावेळी शेख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid02acSKzivfp7MPhqMfNa9gioo7kTbZDSRnWnEyyJRHJqB2tRmLVhNqtewaoGvNmBr9l&id=100042322993937
पुढे बोलताना शेख यांनी खंत व्यक्त केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘मनसेच्या अनेक आंदोलनात अग्रभागी राहून अनेक गुन्हे अंगावर घेतले,न्यायालयात फेऱ्या मारल्या,मराठी पाट्या आंदोलनात पोलिसांचा सुज येईपर्यंत मार खाल्ला,पक्षासाठी कधी हे दुख जाहीर केले नाही, अशी खंत शेख यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शेख यांनी म्हटले आहे की, पक्ष स्थापनेपासून मी राज यांच्यासोबत कार्य करीत आहे,पक्षाच्या अनेक आंदोलनात सहभागी होत केसेस अंगावर घेतल्या आहेत,मात्र आता हे दिवस बघायला मिळाले आहेत, असे म्हणत त्यांनी मनातील नाराजी बोलून दाखवली.
महत्त्वाच्या बातम्या
राष्ट्रवादी विरूद्ध भाजप वाद पेटला, फडणवीसांनी सलग १४ ट्विट करत शरद पवारांवर केले गंभीर आरोप, म्हणाले..
सॉफ्ट हिंदुत्वाची चुक काँग्रेस वारंवार का करत आहे? ही आहेत काँग्रेस संपुष्टात येण्याची प्रमुख कारणे
झोमॅटो बॉयचे सत्य समोर येताच भारावला ग्राहक, घेऊन दिली नवीकोरी बाईक, वाचून डोळ्यात येईल पाणी
भयानक! कोकणातल्या चार शिकाऱ्यांनी केला घोरपडीवर बलात्कार; ‘अशी’ झाली पोलखोल