Share

‘…तोपर्यंत मी लग्न करणार नाही’ तरुणीची RCB कडे अजब मागणी, स्टेडियममधील ‘पोस्टर गर्ल’ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामना सुरू असताना एका महिलेने दाखवलेले पोस्टर सध्या चर्चेत आले आहे. ही महिला आरसीबी संघाची चाहती आहे. तिचे पोस्टर वाचून तुम्ही देखील नक्कीच अवाक व्हाल.

नुकत्याच झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पराभव झाला. सामना सुरू असताना स्टेडियम मध्ये उपस्थित एका महिलेने पोस्टर दाखवले. संबंधित महिला आरसीबीची चाहती आहे. तिनं तिच्या पोस्टर वरती लिहिले की, ‘आरसीबी आयपीएलची ट्रॉफी जिंकत नाही, तोपर्यंत मी लग्नच करणार नाही’

तिच्या या पोस्टरकडे सर्वांचे लक्ष गेले. यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी अजून बरीच वर्षे लग्न न करता रहावं लागेल अशी गमतीशीर प्रतिक्रिया दिली. तर काहींनी आरसीबीला विनंती केली की ‘तुम्ही तिच्या जीवाशी खेळू नका’ क्रिकेटर अमित मिश्राने देखील ट्विटर वरती या महिलेचे हे मजेदार पोस्टर शेअर केलं आहे.

आयपीएलच्या महाकुंभात प्रत्येक संघाचे चाहते आपल्या संघाशी असलेल्या जिव्हाळ्यापोटी मैदानात येऊन त्यांचा उत्साह वाढवत असतात. अशामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची चाहती असलेल्या महिलेचा असा मजेदार आशय असलेला पोस्टर व्हायरल होत आहे.

आतापर्यंत आरसीबी संघाने एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. यावेळी संघ चांगल्या लयीत असून आरसीबी चॅम्पियन होईल अशी आशा चाहत्यांना आहे. या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यामध्ये त्यांनी तीन सामने जिंकले आहेत.

आरसीबी संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यापूर्वी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात होते, पण तो संघाला आयपीएलचे एकही विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. यावेळी संघ कर्णधारासह इतिहास रचेल, अशी आशा आरसीबीच्या चाहत्यांना आहे.

मनोरंजन खेळ

Join WhatsApp

Join Now