भाजप आणि महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेची केलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. भाजपच्या सत्यजित कदम आणि काँग्रेसच्या जयश्री पाटलांमध्ये तगडी लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री पाटील तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात होते.
तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली. तर दुसरीकडे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पाकिटातून पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भाजपच्या ५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८६ हजार ३० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच एक वेगळी बातमी समोर येत आहे. मंगळवार पेठेतील अहिल्यादेवी मतदान केंद्रावर चंद्रकांत पाटील यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाटील डोक्यावर टोप्या आणि गळ्यात उपरणी घातलेल्या कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावर आले होते.
मात्र पाटील येताच मतदारांनी ‘जय जिजाऊ,जय शिवराय,’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यामुळे काहीवेळ मतदान केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसतं आहे की, पाटील हे जिल्ह्याबाहेरील २०-२५ कार्यकर्त्यांसह टोप्या व गळ्यात पक्षाचे स्कार्फ घालून मतदान केंद्रावर आले होते.
त्यानंतर हे एकप्रकारचं दबावतंत्र व शक्तीप्रदर्शन असल्याचा आरोप मतदारांकडून करण्यात आला आहे. यामुळे पाटील यांना मतदारांची नाराजी सहन करावी लागली. या सर्व प्रकारानंतर पाटील यांना कार्यकर्त्यांसह मतदार केंद्रातून काढता पाय घ्यावा लागला.
तर दुसरीकडे सतेज पाटील यांनी देखील काल मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर जहरी टीका केली. ‘भाजपला जनाधार नाही, यामुळे त्यांनी पैसे वाटले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. ‘पैशानं स्वाभिमान विकला जाणार नाही हे कोल्हापूरचे लोक दाखवून देतील,’ असेही सतेज पाटील यांनी म्हटले.
काँग्रेसने कुठेही पैशांचे वाटप केलेले नाही, असा दावा सतेज पाटील यांनी केला. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं. तसेच या मतदान प्रक्रियेसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल
गुणरत्न सदावर्तेंचा पाय आणखी खोलात; मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल
‘या’ खेळाडूने राजस्थानला दिला धोका, नेट प्रॅक्टीस करताना घेतला संन्यास, चाहते झाले हैराण
एकेकाळी जेवण करायला नव्हते पैसै आणि राहायला नव्हते घर, आज करोडोंचा मालक आहे ऋषभ पंत