Share

अजित पवारांच्या ‘त्या’ आरोपांवर राज ठाकरेंचे खणखणीत प्रत्युत्तर; थेट जाहीर पुरावाच दिला

raj
2 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर पडसाद अजूनही उमटत आहे. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत, तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा इशारा राज यांनी दिला होता.

त्यांतर चांगलेच राजकीय वातावरण तापले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केले होते. ‘राज ठाकरे यांना काय भोंगे आत्ताच दिसले का? याच्याआधी झोपा काढत होतात का?, असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंना लक्ष केले होते.

अजित पवारांच्या त्या टीकेवर आज राज ठाकरेंनी भाष्य केले. राज ठाकरे यांनी थेट पुरावेच दिले. राज ठाकरेंनी आपल्याच विधानांचे २८ जुलै २०१८, एक ऑगस्ट २०१८, २३ जानेवारी २०२० असे तीन व्हिडीओ अजित पवारांसाठी वाजवले. यामध्ये मशिदींवरील भोंग्यांबाबत त्यांनी भूमिका मांडली होती.

याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, अजित पवार, मी कधी कुठली गोष्ट बोललोय, हे मला नीट आठवतंय,तुमच्या माहितीसाठी फक्त ३ व्हिडीओ आणले आहेत,मी याआधीही बोललो होतो,पण त्याचे मला काही व्हिडीओ सापडले नाहीत, असे म्हणत राज यांनी थेट पुरावेच सादर केले.

तसेच पुढे बोलताना अजित पवारांना टोला देखील लगावला. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘तो जो सकाळचा शपथविधी झाला, त्यानंतर शरद पवारांनी जो आवाज काढला, त्यानंतर अजित पवारांना तीन-चार महिने ऐकू येत नव्हतं काही, त्यानंतर त्यांना कूSSS असा आवाज ऐकू येत नव्हता. त्यामुळे मी जे काही बोललो, ते त्यांना कळलंच नाही.’

दरम्यान, ‘आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही,त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं, अशी ठाम भूमिका राज ठाकरेंनी पुन्हा मांडली. पुढे राज ठाकरे म्हणाले. ‘३ तारखेला ईद आहे,माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाही,महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही.’

‘आज १२ तारीख आहे,१२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी तुम्ही बोला, त्यांना सांगा, सगळे लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत, ३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असे राज यावेळी बोलताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now